India slams Pakistans repeated references on Jammu and Kashmir at United Nations
नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांची (UN) देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मंगळवारी (25 मार्च) बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने पाकिस्तानला जोरदार शब्दात फटकारले. भारताने पाकिस्तानला ठाम इशारा देत म्हटले की, बेकायदेशीरपणे कब्जा घेतलेल्या भागातून माघार घ्यावी. गेल्या अनेक वर्षापासून भारत पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन वाद झाला आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. हरीश यांनी म्हटले की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राही. यामुळे पाकिस्तानने सतत या मुद्दयावर बोलणं सोडावे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या मुद्द्यावर अपप्रचार करु नये. यामुळे त्यांच्या दाव्यांना कोणताही अधिकार मिळत नाही. याउलट, त्यांच्या या वागण्यावरुन दहशतवाद्यांना समर्थ आणि भारताविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न दिसून येतात.
भारताने पाकिस्तानला अवैधरित्या ताबा मिळवललेल्या पाक व्याप्त काश्मीर (PoK) तून परत जाण्यास ठामपणे सांगितले आहे. यापूर्वीही जिनिव्हातील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHR) चर्चेदरम्यान भारताने पाकिस्ताने खडे बोल सुनावले होते. या परिषदेतही जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकार उलंलघनाच्या केलेल्या आरोपांवर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, पाकिस्ताने आपला संकुचित दृष्टीकोन आणि फुटीरवादी अजेंड्यातून बाहेर पडावे. तसेच संयुक्त राष्ट्रांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये. भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी संयुक्त राष्ट्रांत भाष्य करताना पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेल्या आरोपांचे खंडन केले. त्यांना म्हटले की, वारंवर उल्लेख केल्याने पाकिस्तानचे दावे सिद्ध होत नाहीत. तसेच जम्मू-कश्मीरवर भारताची ऐतिहासिक आणि कायदेशीर मालकी असल्याचेही त्यांना स्पष्ट केले.
जम्मू आणि कश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तातने दहशतवाद्यांना मदत केल्या अनेक पुराव्यांवरुन स्पष्ट होते की, त्यांनी शांतता आणि स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न केला आहेय यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर दखल घेण्याची मागणी भारताने केली आहे. भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानाला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देण्यासाठी भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले आहेत.