पाकिस्तानमध्ये अराजकता! बलुचिस्तानला पाकपासून वेगळे करण्याची बलुच नागरिकांची मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठ्या बलुच बडखोरांचा विद्रोह सुरु आहे. शिवाय पाकिस्तान लष्करानेही बलुच दहशतवाद्यांना संपण्यासाठी रक्ततांडव मांडला आहे. दहशतवादी आणि लष्करामध्ये भीषण युद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच बलुच लिबरेशन आर्मीने डाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. नोशकी जिल्ल्ह्यात झालेल्या या हल्ल्यांत अनेक लोकांचा मृत्यू झाला. बलुच बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये तणाव शिगेला पोहोच असून मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. मेहरंग बलोच यांच्या अटकेनंतर लोक रस्तावर उकरले आहेत. पाकिस्तानी लष्करावर बलुच लोकांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 13 वर्षांच्या मुलासह तीन ठार झाले आहेत.
शिवाय, बलुच जनतेने पाकिस्तानपासून बलुचिस्तानला वेगळे करण्याची, त्यांच्या स्वातंत्र्यसाठीची मागणी केली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. बुलच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, लष्कराने हजारो बलुच लोकांना गायब केले आहे. अनेकांना चिरडून मारुन टाकले आहे. शांततपूर्ण आंदोलनात लष्कराकडून गोळीबार केला जात आहे.यामुळे बलुच नागरिकांमध्ये लष्कराविरोधात मोठ्या प्रमाणात रोष वाढला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान लष्कर बलुच लोकांच्या हक्कांवर दबाव आणत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2000 च्या दशकानंतर पाकिस्तानी सैन्याने बलुच चवळीच्या नावाखाली त्यांना सपवण्याची मोहीम सुरु केली आहे. पाकिस्तान लष्कराने त्यांना मारा आणि टाका रणनीतीचा अवलंब केला आहे.
तसेच हजारो बलुच तरुणांना गायब करण्यात आले आहे, बनावटी हल्ल्यांमुळे अनेक लोक ठार झाले आहेत. अनेकांना कोणत्याही कारणाशिवाय तुरुंगात टाकण्यात आले असन त्यांना लष्कराच्या क्रूर छळांना सामोर जावे लागत आहे.बलुचमधील समाजसेवक, मानवाधिकार कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पत्रकार यांनांही मारले जात आहे. बलुचिस्तानला पाकिस्तान लष्कराचा अन्याय सहन करावा लागत आहे. म्हणून बलुच लिबरेशन आर्मीने त्यांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा मार्ग नियुक्त केला आहे.
सध्या बलुच महिलांच्या नेतृत्वाखाली बलुच यकजहती समिती (BYC) स्थान करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश शांतच्या मार्गे आवाज उठवणे होता. मात्र पाकिस्तान लष्कराने या चळवळीला बंद करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 2023 मध्ये महरग बुॉलुचच्या नेतृत्वाखाली बलुच नरसंहारविरोधी मार्च काढण्यात आले होते. मात्र, लष्कराने आंदोलकांनी धमक्या दिल्या, अनेकांना अटक करुन अमानुष छळ केला. यामुळे पाकिस्तानविरोधात बलुच लिबरेशन आर्मीने बंड पुकारला.
जुलै 2024 मध्ये ग्वादर येथे बलुच्यांच्या एका गटाने ‘बलुच राजी मुची’आयोजित केली होती. यामध्ये बलुचिस्तानच्या लोक एकत्र आले आणि आंदोलन केले. हे बलुचिस्तानमधील सर्वात मोठे शांततपूर्ण आंदोलन होते. जानेवारी 2025 पासून बलुच नरसंहार स्मृती दिन साजरा करण्यात आला. हजारो लोक यासाठी उपस्थित होते. मात्र, पाकिस्तानने या आंदोलनातही गोळीबार घडवून आणला, हजारो लोकांना चिरडून टाकण्यात आले.
यामुळे बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्कराविरोधात हल्ले सुरु केले. सध्या बलुच नागरिक आता शांत बसणार नाहीत, आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळावे अशा मागणी होत आहे. सध्या बलुच लढा एका निर्णयाक टप्प्यावर येउन पोहोचला असून बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळं होईल का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.