नवी दिल्ली: भारताची 14 कोटीं रुपयांची फसवणूक केल्यानंतर फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसी विदेशात सैरसपाटा करत आहे. भारतातून पळून गेल्यानंतर चोकसी अँटिग्वात लपून बसला होता. आता त्याने तिथून पळ काढला आहे. सध्या फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसी युरोपियन देशात वास्तव करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसीकडे बेल्जियमचे नागरिकत्व असून तो बेल्जियममध्ये राहत आहे. याची पुष्टी बेल्जियमच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केली आहे.
बेल्जियन फेडरल पब्लिक सर्व्हिस (FPAS) च्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्त्यांनी आणि प्रेस विभागाचे प्रमुख डेव्हिड जॉर्डन्स यांनी FPAS परराष्ट्र व्यवहार विभागाला फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसीची माहिती दिली. सध्या बेल्जियम सरकार फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसीवर लक्ष ठेवून आहेत. सरकारने म्हटले आहे की, बेल्जियम त्याच्या वैयक्तिक बाबींवर भाष्य करणार नाही. सध्या हे प्रकरण फेडरल पब्लित सर्व्हिस जस्टिसच्या अधिकारक्षेत्रात येते.
अँटिग्वा आणि बारबुडाचे परराष्ट्र मंत्री ईपी चेट ग्रीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसी आरोग्य उपचारांसाठी परदेशात गेला होता. सध्या तो अजूनही बेल्जियमचा नागरिक आहे. फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसी सध्या त्याची पत्नी प्रीतीसोबत बेल्जियममधील अँटवर्पमध्ये वास्तव करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याची पत्नीही बेल्जियमची नागरिक आहे.
यामुळे त्याला एफ रेसिडेन्सी कार्ड मिळाले. यापूर्वी तो भारतातून अँटिग्वाला पळून गेला होता. तसेच त्याच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व असल्याने युरोपीय देशांमध्ये प्रवास करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. अशा परिस्थितीत तो सतत फिरत असल्याने त्याला देशात परत आणणे भारत सरकारसाठी कठीण होत आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोकसी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांचा समावेश आहे. दोघांवर बँकेची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने दोघांना फरार घोषित केले असून सध्या त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुतण्या नीरव मोदीचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. दरम्यान बारबुडाचे परराष्ट्र मंत्री ग्रीन यांनी, भारत आणि अँटिग्वा-बार्बुडाची सरकार याबाबत एकमेकांनाच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.