India starts Talisman Saber 2025 with 19 countries and 35,000 troops Pakistan concerned
India military exercise : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय लष्करी सराव ‘तालिस्मन सेबर २०२५’ जोरात सुरू झाला असून, भारताने या महत्त्वाच्या युद्धसरावात सहभाग घेऊन आपली लष्करी ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या युद्धाभ्यासामध्ये भारतासह १९ मित्र राष्ट्रांचा समावेश असून, जवळपास ३५,००० हून अधिक सैनिक विविध युद्ध कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर करत आहेत.
भारताने केवळ सहभागच नाही दिला, तर यामध्ये तो एक सक्रिय भागीदार म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे, या सरावाचे स्वरूप केवळ स्थल लढाईपुरते मर्यादित नसून, आकाश आणि समुद्र या दोन्ही पातळ्यांवर एकत्रित युद्धाभ्यास केला जात आहे. अशा प्रकारचा त्रिस्तरीय युद्ध सराव फारच दुर्मीळ असतो, त्यामुळेच ‘तालिस्मन सेबर’ याला जागतिक लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतासह यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जपान, जर्मनी, युनायटेड किंग्डम, सिंगापूर, थायलंड, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, नेदरलँड्स, नॉर्वे, पापुआ न्यू गिनी, फिजी, फिलीपिन्स, टोंगा यांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय, व्हिएतनाम आणि मलेशिया हे देश निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
हा युद्धसराव मुख्यतः ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्स, ख्रिसमस आयलंड आणि पापुआ न्यू गिनी या भागांमध्ये सुरू असून, हे ठिकाण इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या सरावाच्या माध्यमातून भारत आणि त्याचे मित्र राष्ट्र संयुक्त ऑपरेशन्स, इंटेलिजन्स शेअरिंग, आणि सामूहिक सुरक्षा तत्त्वांची चाचणी घेत आहेत.
भारताने या युद्धसरावात केवळ शाब्दिक उपस्थिती दाखवली नाही, तर अत्याधुनिक युद्धतंत्राचा वापर करत महत्त्वाचा सहभाग नोंदवला आहे. भारतीय सैन्याने ऑस्ट्रेलियाच्या HIMARS प्रणालीसोबत लाईव्ह फायर ड्रिल्स, समन्वित बॉम्बस्फोट, आणि मोबाइल रॉकेट लाँच सिस्टीमचे प्रात्यक्षिक सादर केले. हे सर्व एकात्मिक युद्ध धोरणांचा भाग आहे, जे भविष्यातील लष्करी सामंजस्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भारताचा या सरावातील सहभाग पाकिस्तानसाठी निश्चितच तणाव वाढवणारा आहे. भारताने आपल्या १९ मित्र देशांसह युद्ध तयारीत उतरल्याने, पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला आहे की भारत आता फक्त संरक्षणात्मक भूमिका न बजावता, आक्रमकपणे उत्तर देण्याच्या पथावर आहे. चीनसोबतच्या मैत्रीचा आधार घेऊन पाकिस्तान नेहमी भारताविरुद्ध कट रचतो, मात्र अशा आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे भारताची रणनीतिक ताकद दुप्पट झाली आहे.
‘तालिस्मन सेबर २०२५’ युद्धसरावामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात सामरिक समतोल राखण्यास मदत होईल, असे जागतिक लष्करी तज्ज्ञ मानतात. भारतासारख्या विकसनशील आणि उदयोन्मुख शक्तीने अशा महत्त्वाच्या सरावात आपली उपस्थिती नोंदवणे म्हणजे सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी यांचा योग्य समतोल साधणे होय.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Ring of Fire’ मधून बाहेर आला राक्षस! 1600 किमी धुराची नदी, NASAलाही बसला धक्का
‘Talisman Saber 2025’ युद्धसरावात भारताची सशक्त उपस्थिती ही भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची साक्ष आहे. १९ मित्र राष्ट्रांसोबत सुसंगततेने युद्धाभ्यास करणे म्हणजे केवळ एक सराव नसून, भविष्यातील सामरिक धोरणांचा पाया घालणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकारच्या सरावांमुळे भारताची लष्करी प्रतिमा अधिक बळकट होत असून, भविष्यातील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज होत आहे.