India-Taliban Diplomacy Indian envoy meets Taliban leadership amid diplomatic friction with Pakistan
काबूल: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जागितक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. भारताने पाकिस्तानविरोधात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचर भारताने पाकिस्तानला चारी बाजून घेरण्याची तयारी देखील सुरु केली आहे. यावेळी भारताने जागतिक महासत्ता असलेल्या देशांशी चर्चा केली आहे.
दरम्यान भारत आणि तालिबानमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक रविवारी (27 एप्रिल) रोजी पार पडली. यामध्ये दोन्ही देशांच्या उच्च अधिकारी सहभागी झाले होते. तालिबान आणि पाकिस्तानमध्ये संबंध चांगले नसल्यामुळे भारतासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. तालिबाननेही पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारताला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
भारताचे वरिष्ठ राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) सचिव तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि भारत विभागचे (PAI) चे चार्ज डी अफेयर्स आनंद प्रकाश यांनी तालिबानला भेट दिली. त्यांनी काबूलमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीन खान मुत्ताकी यांची भेट घेतली. अंतिरम अफगाणिस्तान सरकारने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामनुसार, भारताने तालिबान अधिकाऱ्यांशी, अफगाणिस्तानमध्ये रखडलेल्या प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारतासोबत राजनैतिक आमि आर्थिक संबंधाना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मुत्ताकी यांनी भारतीय गुंणतवणूक दारांना अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूकीचे आवाहन केले. या द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांतील राजकीय, व्यापर, वाहतूक संबंध आणि अलीकडीलच्या प्रादेशिक राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली.
तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख सुहेल शाहीन यांनी म्हटले की, “आम्ही भारतासोबत गुंतवणूक आणि सहकार्य पुन्हा सुरु करण्यास तयार आहोत, तसेच इतर प्रादेशिक देशांकडूनही. 2001 ते 2021 दरम्यान, भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा प्रादेशिक देणगीदार होता. भारताने अफगाणिस्तानला 3 अब्ज डॉलरची मदत केली होती.
भारताने अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतामध्ये वीज पुरवठा, रस्त कनेक्टिव्हिटी, आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि क्षमता बांधणीसारख्या क्षेत्रामध्ये 500 हून अधिक प्रकल्पांना निधी दिला होता. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंर भारत-अफगाणिस्तान विकास सहकार्यात अडथळे आले होते. पंरतु भारत सरकाने मानतावादी मदत देणे सुरु ठेवले. भारताने अफगाणिस्तान औषधे आणि वैद्यकीय उरकरणांची मदत पुरवली आहे.
दरम्यान रविवारी (27 एप्रिल) झालेल्या बैठकीत दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांनी राजनैतिक संबंध वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुत्ताकी यांनी भारताला अफगाणिस्तानमधील गतिशीलता वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये अफगाण रुग्ण, विद्यार्थी आणि व्यावसायिंकांसाठी व्हिसा व्यवस्था पुनर्सुचित करण्याचे म्हटले आहे. बैठकीच्या शेवटी दोन्ही देशाच्या बाजूने संबंध अधिक मजबूत करण्यावर, भर देण्यात आला आहे.