मॉस्को: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानवादावर लागले आहे. याच दरम्यान दुसरीकडे रशियाने युक्रेनच्या ताब्यात असलेला कुर्स्क प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला आहे. हा रशियासाठी मोठा लष्करी विजय मानला जात आहे. मात्र याच्या काही दिवस आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासमोर शांतात चर्चेचा प्रस्ताव मांडला होती. तसेच पुतिन यांनी ईस्टर समाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. यामुळे रशियाच्या कुर्स्कवरील कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
दरम्यान पुन्हा एकदा रशियाने अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रशियाच्या क्रेमलिन कार्यालयाने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये 8 मे ते 10 मे 2025 पर्यंत पूर्णंत युद्धबंदी राहिल. हा निर्णय दुसऱ्या महायुद्धीतील नाझी जर्मनीवरील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, युद्धबंदी 8 मे रोजी मध्यरात्रीपासून लागू होईल आणि 10 मे पर्यंत राहिल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनानिमित्त मानतावादी कारणास्तव शत्रुत्व पूर्णपणे थांबवणार असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. या काळात पुतिन यांनी कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या युक्रेनसाठी रशियाचा हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.
यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ईस्टर सणाच्या निमित्ताने 30 तासांच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. यावेळी रशियन सैन्याला युक्रेनमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचत आले होते. तसेच युक्रेन देखील या आदेशचा पालन करेल असे सांगितले होते. याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धबंदीच्या प्रस्ताव स्वीकरला होता. परंतु तरीही रशियन सैन्याने यूक्रेनवर हल्ला केला होता.
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे,. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. परंतु ही चर्चा अयशस्वी राहिली आहे. रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे.
याच दरम्यान पोप यांच्या अत्यंसंस्काराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देखील उपस्थित होते. यादरम्यान त्यानी व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतली. व्हाईट हाउसमधील जोरदार वादाविवादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची ही पहिलीच भेट होती. या बैठकीदरम्यान झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु दोन्ही नेत्यांनी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. तसेच यावेळी केवळ ट्रम्प आणि झेलेन्स्की उपस्थित होते.