Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतात जन्म घेणार पुढील दलाई लामा’; चीनचा जळफळाट, उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून ‘India vs China’ जुंपली

Dalai Lama succession plan : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 03, 2025 | 01:51 PM
India to China on Dalai Lama No interference

India to China on Dalai Lama No interference

Follow Us
Close
Follow Us:

Dalai Lama succession plan : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटले आहे. चीनकडून वारंवार असा दावा केला जात आहे की, दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड त्यांच्याच संमतीने व्हावी लागेल, अन्यथा ती प्रक्रिया वैध मानली जाणार नाही. मात्र, आता भारताने या मुद्यावर आपली अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. भारताने म्हटले आहे की, दलाई लामांना वगळता त्यांच्या उत्तराधिकारीबाबत निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, आणि या पवित्र प्रक्रियेत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाचा आम्ही निषेध करतो.

चीनच्या मनमानी धोरणावर भारताचा आक्षेप

चीन सरकारचा नेहमीचा दावा राहिला आहे की, तिबेट हा त्यांचा अविभाज्य भाग असून, तिथल्या धार्मिक आणि राजकीय नेतृत्वावर केवळ बीजिंगलाच नियंत्रण असावे. याच पार्श्वभूमीवर चीनने म्हटले होते की, दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे चीन सरकारच ठरवेल आणि त्याविना कुठलीही निवड वैध मानली जाणार नाही.

या भूमिकेला आता भारत सरकारकडून स्पष्ट विरोध करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताने या मुद्यावर जाहीरपणे म्हटले आहे की, “दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ दलाई लामांनाच आहे. ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया असून, त्यात कोणत्याही राजकीय शक्तीने हस्तक्षेप करू नये.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेत 48 तासांत होणार मोठा व्यापार करार; ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरू

तिबेटमधील संघर्ष आणि भारताची भूमिका

दलाई लामा 1959 साली तिबेटमधील चिनी दडपशाहीमुळे भारतामध्ये आश्रयाला आले होते. तेव्हापासून ते धर्मशाळामध्ये निर्वासित जीवन जगत आहेत आणि तिथून त्यांनी तिबेटच्या स्वायत्ततेसाठी शांततामूलक लढा सुरू ठेवला आहे. आज दलाई लामा संपूर्ण जगात शांती, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक मानले जातात. भारताने नेहमीच दलाई लामांचा सन्मान केला असून, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. भारताची ही भूमिकाच चीनला खटकत आली आहे. चीन दलाई लामांना नेहमी “फुटीरतावादी” असे संबोधतो आणि त्यांच्यावर चीनविरोधी कारवाया केल्याचा आरोप करतो.

भविष्यकालीन संकट?

दलाई लामा सध्या 89 वर्षांचे असून, त्यांच्या उत्तराधिकारीची निवड हा तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय आहे. 14व्या दलाई लामांनंतर कोण त्यांच्या जागी येईल, हे ठरवण्याची प्रक्रिया धार्मिक परंपरेनुसारच होणार आहे. जर चीनने आपल्या राजकीय हितासाठी नवीन “दलाई लामा” तयार करण्याचा प्रयत्न केला, तर ते तिबेटी समुदायासाठी, भारतासाठी तसेच संपूर्ण जागतिक बौद्ध समाजासाठी अस्वीकार्य असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खळबळजनक! पाकिस्तानने चीनच्या मदतीने कशी उभी केली ‘किल चेन’? अमेरिकेच्या विरोधात ड्रॅगनची रणनिती उघड

 भारताचा स्पष्ट इशारा

भारताचा स्पष्ट संदेश आहे – “धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये चीनचा राजकीय हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ त्यांच्याचकडे आहे.” ही प्रतिक्रिया केवळ चीनसाठी इशारा नाही, तर ती जागतिक समुदायालाही भारताच्या तिबेटधोरणाची आठवण करून देणारी आहे. भारताची ही भूमिका भविष्यात तिबेटमधील संघर्षात निर्णायक ठरू शकते, आणि चीनच्या वाढत्या विस्तारवादाविरुद्ध एक मजबूत धार्मिक आणि नैतिक आधार म्हणूनही उभी राहू शकते.

Web Title: India to china on dalai lama no interference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • China
  • Dalai Lama
  • india

संबंधित बातम्या

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
1

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद
2

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित
3

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित

ChinaNews : चीनने नागरिकांना दिला Japanला प्रवास न करण्याचा सल्ला; जपानी पंतप्रधानांच्या वक्तव्याने वादंग
4

ChinaNews : चीनने नागरिकांना दिला Japanला प्रवास न करण्याचा सल्ला; जपानी पंतप्रधानांच्या वक्तव्याने वादंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.