Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Indian Flight Enters Pakistan Airspace : २२ जून २०२६ रोजी भारतीय विमान कंपनी एअर इंडियाच्या अमृतसरला जाणाऱ्या एका फ्लाइटने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला होता. तांत्रिक बिघाडामुळे आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटले आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 04:44 PM
Indian Flight Enters Pakistan Airspace

Indian Flight Enters Pakistan Airspace

Follow Us
Follow Us:
  • एअर इंडियाचे विमान थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत
  • तांत्रिक बिघाडामुळे आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटले
  • DGCA कडून कारवाई
Indian Flight Enters Pakistan Airspace : दिल्लीहून अमृतसरला येणारे प्रवासी विमान तांत्रिक बिघाडामुळे आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटले आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले. सुदैवाने, वेळेतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने विमानाला तातडीने मागे फिरवण्यात आले आणि नंतर अमृतसर विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. ही घटना सोमवारी घडली असून, बुधवारी ती समोर आली.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

नेमकं काय घडलं?

दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले हे विमान आपल्या नियमित मार्गावरून चालले होते. मात्र, प्रवासादरम्यान विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमानाची दिशा-निर्देशन यंत्रणा प्रभावित झाली आणि विमान थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाले. विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरताच, तेथील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने विमानाचा मार्ग चुकला असल्याचा इशारा दिला. यानंतर पायलट आणि क्रू मेंबर्सनी विमान पुन्हा भारतीय हवाई हद्दीच्या दिशेने वळवले. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत विमानाला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यात आले.

४ तास उशिराने लँडिंग; १५० प्रवासी होते स्वार

तांत्रिक समस्येमुळे आणि मार्ग बदलल्यामुळे विमानाला अमृतसरला पोहोचण्यास कमालीचा उशीर झाला. वेळापत्रकानुसार प्रवाशांना रात्री साडेदहाच्या सुमारास अमृतसरला पोहोचणे अपेक्षित होते, परंतु हे विमान सुमारे चार तास उशिराने आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकले. यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले. सूत्रांनुसार, या विमानात सुमारे १५० प्रवासी स्वार होते. या संपूर्ण थरारादरम्यान सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमानाचे अमृतसर येथे सुरक्षित लैंडिंग झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

DGCA कडून कारवाई

दरम्यान DGCA ने या घटनेवर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी तातडीने समन्वय साधला. नंतर विमान परत दिल्लीला नेण्यात आले. काही तासानंतर विमान पुन्हा अमृतसरसाठी रवाना झाले. परंतु वेळेत माहिती न दिल्याने संबंधित एअर ट्रॅफिक कंट्रोलर फ्लाईट क्रू यांच्यावर अंतरिम कारवाई केली आहे. पाकिस्तानने एप्रिल २०२५ पासून भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तानच्या विमानांनाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी नाही.

पाकिस्तानी विमान भरकटले

यापूर्वी १२ जून रोजी खराब हवामानामूळे पाकिस्तानचे फ्लाय जिना 9पी514 विमान भारतीय हवाई हद्दीत शिरले होते. लाहोर विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान त्याच्या निर्धारित मार्गावरुन भरकटले होते.

STORY | Air India plane strays into Pak airspace; DGCA takes action against air traffic controller, crew An Air India plane operating a flight from the national capital strayed into the Pakistan airspace on Monday night while manoeuvring a go-around at the Amritsar airport.… pic.twitter.com/bjqEorFBdu — Press Trust of India (@PTI_News) June 25, 2026

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

Web Title: Indian flight enters pakistan airspace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • india
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.