
Donald Trump
या जहाजांवरील हल्ल्यांबाबत बोलताा ट्रम्प यांनी इराणने ड्रोन हल्ला केल्याचे म्हटले. परंतु तो पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. पण कोणच्या जहाजांवर हल्ला केला हे स्पष्ट केले नाही. त्यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणने ड्रोन हल्ला केला आहे. हा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. परंतु या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय नाविक असलेल्या जहाजांवरील झालेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला. यामुळे भारताने अमेरिकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत या घातक कारवाईला अयोग्य म्हटले आणि हल्ल्यांबाबत स्पष्टीकरण मागितले.
यावर प्रतिक्रिया देताना मार्को रुबियो यांनी म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांनी अमेरिकेच्या सैन्याचे आदेश पाळले पाहिजेत. नाकेबंदीचे उल्लंघन आणि इराणी तेल वाहतुकीला सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भारताने भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय नाविक असलेल्या तीन जहाजांवर गेल्या आठवड्यात हल्ले झाले होते. यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. ९ जून २०२६ रोजी एमटी मॅरिव्हेक्सवर पहिला हल्ला झाला होता. यावेळी २४ भारतीय नाविक जहाजावर उपस्थित होते. या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
त्यानंतर १० जूनला एमटी सेटेबेलोवरील हल्ल्यावेळी २४ भारतीय क्रू मेंबर्स जहाजावर कार्यरत होते. यातील २१ जणांना वाचवण्यात यश आले असून तीन जण बेपत्ता झाले होते. मात्र, नंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. यानंतर एमटी जलवीर या भारतीय नाविक असलेल्या जहाजावरही हल्ल्याची घटना घडली. या जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप