PM Modi G7 Summit : G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल; भारतीय समुदायाकडून जोरदार स्वागत (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
Iran-US War : होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांवर इराण लादू शकतो शुल्क; आता आणखी फटका बसणार?
पंतप्रधान मोदी नीसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ दा अजूर वर पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी फ्रान्सचे अनेक मंत्री आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ज्यामध्ये फ्रान्सचे शिक्षण मंत्री, एडुआर्ड ग्रेफे, उच्च शिक्षण आणि संशोधन मंत्री फिलिपि बाप्टिस्ट आणि नीसचे महापौर एरिक सिओटी यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष स्वागत केले. तसेच भारतातील फ्रान्सचे राजदूत थिएरी माथू देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
तसेच नीसमध्ये राहाणाऱ्या भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधान मोदींची जोरदार स्वागत करण्यात आले. उपस्थितांनी तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत, परदेशात राहूनही मातृभूमीशी असलेले भारतीय समूदायाचे नाते अतूट असल्याचे म्हटले.
तसेच नीस सीटी हॉलमध्येही हॉलवरही पंतप्रधान मोदींच्या स्वागतानिमित्त भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विदेश नेत्याला दिला जाणारा हा विशेष सन्मान मानला जातो.
Je viens d’atterrir à Nice. Outre Nice, cette visite en France comprend des programmes à Évian et à Paris. Elle sera marquée par des rencontres bilatérales et multilatérales, visant à renforcer les liens d’amitié de l’Inde avec ses partenaires clés en matière de développement.… pic.twitter.com/hB9zCWoWoZ — Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026
दरम्यान पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuele Macron) यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेते भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि जागतिक सहकार्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
पंतप्रधान मोदी भारत इनोव्हेट्स या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहे. भारत, फ्रान्स आणि इतर देशांतील स्टार्टअप्स, इनोव्हेशन कंपन्या आणि वेंचर कॅपिटल फंड सहभागी होणार आहे. नव्या भागीदारी आणि गुंतवणूकींच्या संधीवर या कार्यक्रमात चर्चा केली जाईल. यानंतर ते युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियाला १४-१५ जून रोजी भेट देतील.
A memorable welcome from the Indian community in Nice. Though they may be several kilometres away from home, the bond of our diaspora with India remains as strong as ever. pic.twitter.com/CGEkEWyjLV — Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026






