Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hormuz Attack : तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात?
ओमानच्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या एमटी मॅरिव्हेक्स, एमटी सेटेबेलो आणि एमटी जलवीर या जहाजांवर हल्ला केला होता. या तिन्ही जहाजांवर भारतीय नाविक तैनात होते. यातील एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरील ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून अमेरिकेकडे याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमिरेकेवर जोरदार टीका केली आहे. व्यापारी जहाजंवरींल अमेरिकेच्या हल्ल्याला त्यांनी समुद्री दरोडेखोरी म्हटले आहे. भारतीय नाविकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत भारत सरकार आणि नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त केला आहेत. तसेच नाविकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.
दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्याच्यां सुरक्षेबाबत चिंका व्यक्त केली आहे. सध्या ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक सरकारच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवनू आहे.
भारताने मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि समुद्री मार्गांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सरकारने म्हटले आहे.
The brutal U.S. attacks on Indian commercial vessels which have killed at least three Indian nationals, stand as clear evidence of America’s ongoing policy of armed robbery and State piracy. We extend our sympathies to the families and friends of the slain Indian sailors and… — Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) June 11, 2026






