
India's Supersonic Cruise Missile BrahMos in Demand world wide
Dubai Air Show news in Marathi : नवी दिल्ली : भारताच्या ‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रने पुन्हा जगाचे लक्ष वेधले आहे. दुबई एअर शोमध्ये या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी लांबच लांब राग लागली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात या क्षेपणास्त्रामुळे भारताला मोठा विजय मिळला होता. या क्षेपणास्त्राने भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान (India Pakistan War) चीनच्या हवाई संरक्षण प्रणालीला देखील उद्ध्वस्त केले होते. यामुळे ब्रह्मोसच्या ताकदीची संपूर्ण जगात चर्चा सुरु झाली होती. याच्या खरेदीसाठी पॅव्हेलियनमध्ये मोठी गर्दी झाली होती.
पूर्वी ब्रह्मोस केवळ वेगवान आणि मारक क्षमतेसाठी प्रसिद्ध असल्याचे लोकांना माहिती होते. पण ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर या क्षेपणास्त्राच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. ९ ते १० मे दरम्यान झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० MKI या लढाऊ विमानांद्वारे ब्रह्मोस-A क्षेपणास्त्र डागण्यात आले. या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूर खान एअर बेस, जेकबाबद येथील लष्करी तळांना उद्ध्वस्त केले होते.
पाकिस्तानकडे चीनी बनावटीची HQ-9EB, HQ-16FE ही आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली होती. मात्र या प्रणालींना भारताच्या ब्रह्मोसला रोखता आले नाही. चीनच्या लHQ-9EB या मॅक 5+ वेगाने चालणारी ही प्राणाली लक्ष्य गाठण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते परंतु ही प्रणाली देखील निष्प्रक्ष ठरली. ब्रह्मोसने १२ मीटर उंचीवरील S डॉज पॅटर्नला असे उडवले की यामुळे चीनी रडार व इंटरसेप्टर देखील फेल झाले.
यामुळे सध्या दुबई एअर शोमध्ये भारताचे ब्रह्मोस आकर्षण ठरले आहे. भविष्यात याची मोठ्या निर्यातींची शक्यता आहे. सध्या यासाठी चीन-चार देशांसोबत चर्चा सुर आहे. विशेष करुन आखाती देश, दक्षिण-पूर्व आशिया देश, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा देशांनी ब्रह्मोसच्या तंत्रज्ञान माहिती व त्याच्या खरेदीबाबत चर्चा केली. तसेच जगातील अनेक मुस्लिम देश देखील ब्रह्मोसच्या खरेदीचा विचार करत आहेत.
जर ब्रह्मोसची खरेदी वाढली तर याची उत्पादन क्षमता देखील तितकीच वाढणार आहे. ज्यामुळे उत्पादन खर्च वाढले, निर्यातीत वाढल होईल आणि याचा थेट फायदा हा भारताच्या संरक्षण उत्पादन आणि ‘मेक इन इंडिया मिशन’ला होणार आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढणार आहे.
Indian Tejas fighter jet crashed: दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमान तेजस कोसळले
Ans: ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून याचा वेग, अचूनकता, लक्ष्या चकवा देण्याची क्षमता आणि याला रोखता न येण्याची क्षमता यामुळे हे मिसाइल अत्यंत खास ठरत आहे.
Ans: ऑपरेशन सिंदूर दरम्यान या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूर खान एअर बेस, जेकबाबद येथील लष्करी तळांना उद्ध्वस्त केले होते. तसचे चीनच्या हवाई संरक्षण प्रणालीला देखील फेल केले होते.
Ans: दुबई एअर शोमध्ये ब्रह्मोस खरेदीदारांच्या रांगा लागल्या असून यासाठी सध्या सध्या यासाठी चीन-चार देशांसोबत चर्चा सुर आहे. विशेष करुन आखाती देश, दक्षिण-पूर्व आशिया देश, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा देशांनी ब्रह्मोसच्या तंत्रज्ञान माहिती व त्याच्या खरेदीबाबत चर्चा केली. तसेच जगातील अनेक मुस्लिम देश देखील ब्रह्मोसच्या खरेदीचा विचार करत आहेत.