दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमान तेजस कोसळले
Indian Tejas fighter jet crashed: दुबई एअर शोमध्ये एका प्रात्यक्षिकादरम्यान एक भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमान कोसळतानाचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तेजस जेट आकाशात एरोबॅटिक्स करताना दिसत आहे आणि नंतर अचानक जमिनीवर कोसळले. विमान जमिनीवर कोसळताच मोटा स्फोट झाला आणित्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोट उडाले. दरम्यान, तेजस जेटमधील वैमानिक बाहेर पडला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मिळाेलेल्या माहितीनुसार, दुबईतील अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोमध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहेे. शुक्रवारी दुबई वेळेनुसार दुपारी २:१० आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला. अपघातादरम्यान तेजसचा पायलट बाहेर पडला की नाही हे सध्या स्पष्ट नाही. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर धुराचे लोट दिसले.
अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले आहे. हवाई दलाच्या तेजस जेट अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये, राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धाभ्यास दरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळले होते.






