Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायडेन प्रशासनात भारत-अमेरिका संबंध मजबूत; अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)जेक सुलिव्हन यांनी भारत-अमेरिका संबंधावर मोठे वक्तव्य केले आहे.त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील संबंध बायडेन प्रशानात अधिक मजबूत झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 11, 2025 | 12:48 PM
बायडेन प्रशासनात भारत-अमेरिका संबंध मजबूत; अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांची प्रतिक्रीया

बायडेन प्रशासनात भारत-अमेरिका संबंध मजबूत; अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांची प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)जेक सुलिव्हन यांनी भारत-अमेरिका संबंधावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, दोन्ही देश आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत यामध्ये बायडेन प्रशासनाचा हात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारताला भेचट दिली होती. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत

बायडेन प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक बळकट झाले असून पुठील प्रशासनासाठी एक मजबूत पाया ठरेल असेही त्यांनी म्हटले. सुलिवन यांनी व्हाइट हाऊसच्या रूझवेल्ट रूममध्ये आयोजित गोलमेज बैठकीदरम्यान म्हटले की, “आजच्या स्थितीत भारत-अमेरिका संबंध बायडेन प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीपैकी एक आहे.” हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहयोगी आणि भागीदार देशांशी असलेल्या संबंधांचे सशक्तीकरण हे पुढील प्रशासनासाठी एक भक्कम पाया ठरेल, असे त्यांनी सांगितले.  त्यांनी भारत भेटींमुळे दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Politics: बांगलादेशवर पुन्हा स्त्री शक्तीची सत्ता? ‘या’ दोन नेत्या एकत्र येण्याने बदलणार राजकीय समीकरण

उतार-चढावांनंतरही संबंध मजबूत

भारत-अमेरिका संबंधात गेल्या चार वर्षात काही काळात अनेक चढ-उतार आले. याचा उल्लेही सुलिवन यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी सांगितले की, कोणत्याही द्विपक्षीय संबंधांमध्ये असहमती ही अपरिहार्य असते. व्यापार, अर्थव्यवस्था किंवा G20 घोषणापत्रातील शब्दावलीसारख्या विषयांवर मतभेद निर्माण होऊ शकतात. मात्र, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे.

सुलिवन यांनी सांगितले की, “गेल्या चार वर्षांत भारत-अमेरिका संबंध अधिकाधिक मजबूत झाले आहेत. काही मुद्द्यांवर असहमती राहिली पण, तरीही दोन्ही देशांनी विश्वास आणि सहकार्याने त्यावर तोडगा काढला आहे.” हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य राखण्यासाठी आणि जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारत-अमेरिकेचे एकत्रित प्रयत्न भविष्यातील संबंधांसाठी महत्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

बायडेन प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

भारत-अमेरिका संबंधांमध्ये बायडेन प्रशासनाने घेतलेले धोरण आणि त्यातील सकारात्मक बदल यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक भक्कम झाली आहे. सुलिवन यांनी भारत दौऱ्यातील चर्चांमुळे द्विपक्षीय संबंधांची दिशा उज्ज्वल राहील, असा विश्वास व्यक्त केला.

बांगलादेशवर अमेरिकेची भूमिका

याशिवाय सुलिवन यांनी बांगलादेशच्या सत्तांतरामध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी खालिस्तानी चरमपंथी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या कटासंदर्भातील प्रकरण पुढील सरकारच्या कार्यकाळातही चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Explainer : 4 दशलक्ष हेक्टरवरील जंगल नष्ट, लाखो प्राणी, कुटुंबं बेघर; का धुमसतेय अमेरिका? वाचा सविस्तर

Web Title: Indo us relations strengthen under biden administration says nsa jake sullivan nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • America
  • india
  • Joe Biden
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
1

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
4

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.