Bangladesh Politics: बांगलादेशवर पुन्हा स्त्री शक्तीची सत्ता? 'या' दोन नेत्या एकत्र येण्याने बदलणार राजकीय समीकरण(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
ढाका: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, सध्या देशातील परिस्थिती पाहता हे सरकार अपयशी ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार असो. युनूसचे सध्याचे सरकार कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.
या सगळ्यात आता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) अध्यक्षा खालिदा झिया याही देश सोडून लंडनला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय झिया अनाथालय ट्रस्ट प्रकरणी निकाल देणार आहे. गेल्या वर्षभरात देश सोडून जाणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये शेख हसीना यांच्यानंतर खालिदा झिया या बांगलादेशच्या दुसऱ्या मोठ्या नेत्या आहेत.
शेख हसीना आणि खालिदा झिया एकत्र
खालिदा जिया यांच्या सोडून जाण्याने बांगलादेशाच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1990 साली शेख हसीना आणि बेगम खालिदा जिया यांनी तानाशाह हुसैन मोहम्मद इरशाद यांच्या विरोधात एकत्र येऊन आंदोलन केले होते, यामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. आता पुन्हा तशाच परिस्थितीचा उदय झाला आहे. यावेळी निशाण्यावर आहेत नोबेल पुरस्कार विजेते आणि बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस.
5 ऑगस्टला शेख हसीना यांनी सत्तेचा राजीनामा दिल्यानंतर, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ला आशा होती की सत्ता खालिदा जिया किंवा त्यांच्या मुलगा तारिक रहमान यांच्या हातात जाईल. मात्र, मोहम्मद युनूस यांनी मुख्य सल्लागार म्हणून सत्ता आपल्या हातात घेतली आणि लोकशाही निवडणुका घेण्याबाबत वेळकाढूपणा सुरू केला. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.
राजकीय तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, जर वेळेत निवडणुका झाल्या नाहीत, तर युनूस तानाशाह इरशाद यांच्यासारखी सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. जनतेच्या मोठ्या वर्गाला “सिलेक्टेड गव्हर्नमेंट” नव्हे, तर “इलेक्टेड गव्हर्नमेंट” हवी आहे. या परिस्थितीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठ्या आंदोलनांची तयारी सुरु केली आहे.
तानाशाह इरशाद यांचा पराभव कसा झाला?
1982 मध्ये जनरल हुसैन मोहम्मद इरशाद यांनी लष्करी तख्तापलटाद्वारे बांगलादेशची सत्ता हाती घेतली आणि स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले. त्यांच्या राजवटीत मानवी हक्कांचे आणि लोकशाहीची उल्लंघन केले होते. मात्र, 1990 मध्ये शेख हसीना (अवामी लीग) आणि खालिदा जिया (BNP) यांनी एकत्र येऊन मोठ्या आंदोलनाद्वारे इरशाद यांना सत्तेतून हटवले. संयुक्त आंदोलन, हडताल आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे इरशाद यांना राजीनामा द्यावा लागला.
सध्याच्या परिस्थितीत शक्यता
सध्या शेख हसीना आणि खालिदा जिया पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तनवली जात. खालिदा जिया सध्या उपचारासाठी लंडनमध्ये असून, तिथून आंदोलनासाठी रणनीती आखत आहेत. शेख हसीना यांना भारताने दिलेल्या पाठिंब्यामुळे या संघर्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळाले आहे. बांगलादेशच्या भविष्यावर लोकशाही प्रक्रियांचा मोठा प्रभाव पडू शकतो. जनता, विरोधी पक्ष आणि आंतरराष्ट्रीय दबाव जर एकत्र आला, तर बांगलादेश पुन्हा लोकशाही मार्गावर येऊ शकतो.