
Indonesia Anak Krakatau eruption 2026 Krakatau volcano eruption flights cancelled
इंडोनेशियामध्ये (Indonesia) निसर्गाचे एक भीषण आणि धडकी भरवणारे रूप पाहायला मिळाले आहे. जावा आणि सुमात्रा या दोन मोठ्या बेटांच्या दरम्यान सुंदा सामुद्रधुनीत स्थित असलेल्या अतिशय सक्रिय अशा ‘अनाक क्राकाटोआ’ (Anak Krakatau) या ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण उद्रेकामुळे अवकाशात सुमारे ५०,००० फूट (१५ किलोमीटर) उंचीपर्यंत ज्वालामुखीय राखेचे आणि धुराचे अक्राळविक्राळ लोट पसरले आहेत. राखेचे हे ढग वाऱ्यासोबत पसरल्याने इंडोनेशियाची राजधानी जकार्तासह लगतच्या अनेक प्रांतांमध्ये काळोखाचे आणि धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून विमानसेवेला मोठा तडाखा बसला आहे.
भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासूनच या ज्वालामुखीच्या पोटात हालचाली तीव्र झाल्या होत्या. रविवारी पहाटे ३:५३ वाजता सुमारे ३० सेकंदांचा एक मोठा स्फोट झाला आणि त्यापाठोपाठ राखेचे दोन प्रचंड लोट बाहेर पडले. यातील पहिला लोट सुमारे २०,००० फूट (६ किमी) उंचीपर्यंत जाऊन ईशान्येकडे सरकला, ज्यामुळे जकार्ता, बांटेन आणि पश्चिम जावाचा परिसर प्रभावित झाला. तर दुसरा अतिशय धोकादायक लोट ५०,००० फूट उंची गाठत पश्चिम आणि वायव्य दिशेने सरकला, ज्याचा फटका लॅम्पुंग, बेंगकुलू आणि सुमात्राच्या पश्चिमेकडील हिंद महासागराच्या क्षेत्राला बसला आहे.
या ज्वालामुखीय राखेचा सर्वात मोठा फटका जकार्ता येथील सोकार्नो-हाटा आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Soekarno-Hatta International Airport) बसला आहे. विमानाच्या इंजिनमध्ये ही बारीक राख गेल्यास भीषण अपघात होण्याचा धोका असल्याने विमानतळ प्रशासनाने तातडीने उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सकाळी ५:३० वाजेपर्यंत उड्डाणे स्थगित केली होती, परंतु राखेची तीव्रता पाहता ही बंदी वाढवण्यात आली. रात्रभर धावपट्टीवर उभी असलेली १७० हून अधिक विमाने जिथल्या तिथे रोखून धरावी लागली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
या आकस्मिक निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण २०९ विमानांच्या उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून, सुमारे २२,८०० प्रवाशांचा प्रवास ऐनवेळी खोळंबला आहे. यात सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइट्सला सर्वाधिक फटका बसला असून सिडनी, हाँगकाँग, ॲमस्टरडॅम, सोल, दोहा आणि क्वालालंपूर यांसारख्या प्रमुख जागतिक शहरांकडे जाणारी उड्डाणे रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. विमानतळावर प्रवाशांनी तिकिटांचे पैसे परत मिळवण्यासाठी आणि आपले सामान परत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
🇮🇩Watch: The photographer successfully captured the moment of #Mount #Anak #Krakatau (22/Dec/2018) in the Sunda Strait, #Banten – #Lampung . Its eruption/volcanic activity then triggered a collapse of the mountain’s body into the sea on the night of December 22, 2018, which… pic.twitter.com/4M7YkG3qtJ — pradhyumn sharma (@pradhyu78651514) September 5, 2026
credit – social media and Twitter
सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जीवितहानीची नोंद झालेली नाही आणि मानवी वस्त्या १६ किमीहून अधिक अंतरावर असल्याने तातडीने स्थलांतराचे आदेश दिलेले नाहीत. मात्र, हवेत पसरलेल्या सूक्ष्म राखेमुळे डोळ्यांची जळजळ आणि श्वासोच्छवासाचे त्रास सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी शाळांचे उपक्रम रद्द करण्यात आले आहेत, तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना आणि पर्यटकांना सक्रिय मुखापासून (Crater) कमीत कमी ३ किलोमीटर दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बाहेर पडताना एन-९५ मास्क आणि गॉगल वापरणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे आणि वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
UPDATE TERBARU ERUPSI GUNUNG ANAK KRAKATAU SABTU PAGI (5 SEPTEMBER 2026)! Aktivitas erupsi Gunung Anak Krakatau di Selat Sunda yang terjadi sejak Jumat malam hingga Sabtu pagi ini (5/9/2026) masih terus menunjukkan eskalasi vulkanik! Setelah visual letusan sempat tidak… pic.twitter.com/ZmW4chv1yg — Sumatera Adil & Federal (@indepenSumatera) September 5, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार
इंडोनेशियाच्या हवामान आणि ज्वालामुखीशास्त्र संस्थेने (BMKG) सध्या त्सुनामीचा थेट धोका नसल्याचे स्पष्ट केले असले तरी परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘अनाक क्राकाटोआ’चा धोकादायक इतिहास. २०१८ मध्ये याच ज्वालामुखीचा मोठा भाग समुद्रात कोसळल्याने आलेल्या महाभयंकर त्सुनामीमुळे ४३० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे प्रशासन कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवण्यास तयार नाही. इंडोनेशिया हा देश पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’ (Ring of Fire) वर वसलेला असल्याने येथे भूकंपाचे धक्का आणि ज्वालामुखीचे उद्रेक वारंवार घडत असतात. सध्या आपत्ती व्यवस्थापन पथके पूर्णपणे हाय अलर्टवर आहेत.