मोठी बातमी ! अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा; 'या' देशाची महत्त्वपूर्ण भूमिका
Israel-Iran War: इराण आणि इस्त्रायलमध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात अमेरिकेने देखील उडी मारली आहे. अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर हल्ला केला आहे. त्याचा बदला म्हणून इराणने सिरियामध्ये अमेरिकेचे असणाऱ्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. तर इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा बदला इराणने घेतला आहे. इस्त्रायलवर तब्बल 40 मिनिटे महाभयानक अशी क्षेपणास्त्र डागली आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
इराणने इस्त्रायलवर तब्बल 15 मिसाईल्स डागल्याची माहिती समोर येत आहे. इराणने इस्त्रायलवर फतेह-1 ही मिसाईल डागले आहे. तर इस्त्रायल एअर फोर्स इराणची राजधानी तेहरानवर हल्ले करत आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. इराणने डागलेल्या मिसाईल्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इराणचा अमेरिकेवर हल्ला
अखेर इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. इराणी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याच्या ३६ तासांनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरियातील अमेरिकेच्या तळावरील हल्ला हा इराणकडून पहिला हल्ला मानला जात आहे. मात्र अद्याप इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु इराणच्या परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हल्ल्याचे संकेत आधीच दिले होते. त्यांनी सांगितले होते की, मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात येईल.
इराणचा गेम निश्चित
सध्या जगामध्ये तिसरे महायुद्ध सुरू असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. इस्त्रायल इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. इस्त्रायल-हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने देखील इस्त्रायाल इराण युद्धात उडी घेत इराणवर हल्ला चढवला आहे. त्यानंतर आता इस्त्रायलने अमेरिकेने केलेल्या जखमेवर मीठ चोळले आहे. इस्त्रायलने इराणच्या अणू केंद्रांवर भीषण हल्ले केले आहेत.
मागच्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर मोठा हल्ला केला होता. मात्र ती आग शमण्याच्या आतच इस्त्रायलने इराणच्या अणू केंद्रांवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. फोर्डो अणू केंद्रावर प्रचंड मोठा हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इराणच्या चिंता पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल इराणला नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ज्या फोर्डो केंद्रावर हल्ला केला होता. त्याच अणू केंद्रावर इस्त्रायलने आज सकाळी भीषण हल्ला केला आहे. त्यामुळे आता अणुयुद्ध सुरू होणार का याची चिंता जगाला सतावत आहे. तर इराण देखील इस्त्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्याप्रकरची रणनीती आखत आहे.