इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला (फोटो- istockphoto)
Israel attack On Iran: सध्या जगामध्ये तिसरे महायुद्ध सुरू असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. इस्त्रायल इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. इस्त्रायल-हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने देखील इस्त्रायाल इराण युद्धात उडी घेत इराणवर हल्ला चढवला आहे. त्यानंतर आता इस्त्रायलने अमेरिकेने केलेल्या जखमेवर मीठ चोळले आहे. इस्त्रायलने इराणच्या अणू केंद्रांवर भीषण हल्ले केले आहेत.
मागच्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर मोठा हल्ला केला होता. मात्र ती आग शमण्याच्या आतच इस्त्रायलने इराणच्या अणू केंद्रांवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. फोर्डो अणू केंद्रावर प्रचंड मोठा हल्ला इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इराणच्या चिंता पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल इराणला नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ज्या फोर्डो केंद्रावर हल्ला केला होता. त्याच अणू केंद्रावर इस्त्रायलने आज सकाळी भीषण हल्ला केला आहे. त्यामुळे आता अणुयुद्ध सुरू होणार का याची चिंता जगाला सतावत आहे. तर इराण देखील इस्त्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्याप्रकरची रणनीती आखत आहे.
इस्त्रायलचा इराणवर ‘न भूतो न भविष्यती’ असा भीषण हल्ला
इस्त्रायलच्या विमानांनी इराणच्या सैन्य ठिकाणे आणि महत्वाच्या भागात मोठे हल्ले केले. तेहरानमध्ये भीषण हल्ले करण्यात आले. औद्योगिक क्षेत्र, संरक्षण क्षेत्र आणि अन्य महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अण्वस्त्र संबंधित काही ठिकाणी इस्त्रायल वायुसेनेने प्रचंड मोठे हल्ले केले. जवळपास 120 बॉम्ब आणि शेकडो मिसाईल्स या हल्ल्यासाठी वापरण्यात आली.
इराणने इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी काही ड्रोन पाठवली होती, ती इस्त्रायल सैन्याने उडवून लावली आहेत. इस्त्रायल वायुसेनेने इराणच्या शस्त्र निर्मितीत मदत करणाऱ्या संस्थेवर देखील मोठा हल्ला केला आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे जगभरातील देश चिंतित झाले आहेत. आण्विक विषयावर चर्चा व्हावि यासाठी अनेक राजकीय मंडळी आणि मोठे देश प्रयत्न करत आहेत.