Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War: इराणने एकाच वेळी केला 8 देशांवर प्रहार! US लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; अबू धाबी, रियाधमध्ये भीषण स्फोट

Iran attacks 8 Middle East countries : इस्रायलने आज इराणवर मोठा हल्ला केला, ज्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. इराणने मध्यपूर्वेतील आठ देशांवरही हल्ला केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 09:12 AM
iran attacks 8 middle east countries us military bases missile strike abu dhabi explosions

iran attacks 8 middle east countries us military bases missile strike abu dhabi explosions

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचा महाविस्फोट
  • अबू धाबी हादरले
  • हवाई क्षेत्र बंद

Iran attacks 8 Middle East countries 2026 : मध्य पूर्वेतील तणावाचा आता ज्वालामुखी झाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने तेहरानवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) एकाच वेळी मध्य पूर्वेतील ८ देशांना लक्ष केले असून प्रामुख्याने तिथल्या अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा वणवा पेटला असून, शांतता पूर्णपणे भंग पावली आहे.

अमेरिकन तळांना केले टार्गेट: कतार, कुवेत आणि बहरीनमध्ये स्फोट

इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘फार्स’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. कतारमधील अल-उदेद हवाई तळ, कुवेतचा अल-सलेम तळ आणि युएईमधील अल-धफ्रा हवाई तळ यांवर इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. बहरीननेही त्यांच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या (5th Fleet) मुख्यालयावर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. कतारच्या पॅट्रियट संरक्षण प्रणालीने काही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली असली तरी, या हल्ल्यांची तीव्रता प्रचंड होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

अबू धाबी आणि रियाधमध्ये दहशतीचे वातावरण

युएईची राजधानी अबू धाबीमध्ये पहाटेच्या सुमारास मोठे स्फोट ऐकू आले. युएई सरकारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणची अनेक क्षेपणास्त्रे रोखली, परंतु एका क्षेपणास्त्राच्या ढिगाऱ्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. युएईने या हल्ल्याला ‘राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन’ म्हटले असून प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे एएफपीने वृत्त दिले आहे, ज्यामुळे संपूर्ण अरब जगतात भीतीचे वातावरण पसरले आहे.

The IRGC (Islamic Revolutionary Guard Corps) claims that Iran has attacked US military bases in Qatar, Kuwait, Bahrain, Jordan, and Iraq, as well as launching “dozens” of ballistic missiles at Israel. This is reported by sources close to the IRGC, such as Nour News, and echoed in… pic.twitter.com/g2OZiPSNMB — Block Narrative (@blocknarrative) February 28, 2026

credit – social media and Twitter

हवाई क्षेत्र ठप्प आणि जागतिक चिंता

युद्धाच्या या भीषण वळणामुळे कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीने आपली हवाई क्षेत्रे तातडीने बंद केली आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला मोठा फटका बसला असून हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायल आणि अमेरिका आपली आक्रमकता थांबवत नाही, तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. इस्रायलच्या दिशेनेही इराणने मोठ्या संख्येने ड्रोन आणि मिसाईल्स डागले असून ‘आयर्न डोम’ प्रणालीवर मोठा ताण येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran’s New War Machine: खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वात ‘कट्टर’ जनरल मैदानात; अहमद वाहिदी बनले IRGC चे नवे प्रमुख

भारतासह जगाचे लक्ष

या वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. भारताने आधीच आपल्या नागरिकांना या देशांमध्ये प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, जर सौदी अरेबिया आणि युएई या युद्धात थेट सामील झाले, तर हे केवळ प्रादेशिक युद्ध न राहता जागतिक महायुद्धाचे रूप घेऊ शकते. खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने मध्य पूर्वेतील कोणत्या देशांवर हल्ला केला आहे?

    Ans: इराणने कतार, कुवेत, युएई, बहरीन आणि सौदी अरेबियासह एकूण ८ देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.

  • Que: अबू धाबीमध्ये काय घडले?

    Ans: इराणने डागलेली क्षेपणास्त्रे युएईच्या संरक्षण प्रणालीने रोखली, परंतु एका स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि राजधानीत भीतीचे वातावरण आहे.

  • Que: या हल्ल्यांमुळे विमान वाहतुकीवर काय परिणाम झाला आहे?

    Ans: कतार, कुवेत आणि युएईने आपली हवाई क्षेत्रे बंद केली असून, शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Web Title: Iran attacks 8 middle east countries us military bases missile strike abu dhabi explosions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Oil Crisis: जगाचा इंधन साठा संपतोय? 50 दिवसांत 50 अब्ज डॉलर्सचे तेल स्वाहा; इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले
1

Oil Crisis: जगाचा इंधन साठा संपतोय? 50 दिवसांत 50 अब्ज डॉलर्सचे तेल स्वाहा; इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले

Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी
2

Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी

Strait Of Hormuz : ‘मूर्खाच्या ट्विटवरून मार्ग उघडणार नाही!’ इराण आक्रमक; होर्मुझ बंद होताच ‘oil prices’ अनियंत्रित
3

Strait Of Hormuz : ‘मूर्खाच्या ट्विटवरून मार्ग उघडणार नाही!’ इराण आक्रमक; होर्मुझ बंद होताच ‘oil prices’ अनियंत्रित

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई
4

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.