Iran backed by China and Russia proposed a NATO-style alliance at the SCO to counter the US and Israel
SCO Iran China Russia alliance : जगातील सामरिक समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आता इराणने एक मोठा पाऊल उचलत अमेरिका आणि इस्रायलच्या प्रभावाला थेट आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या SCO (शांघाय सहकार्य संघटना) २०२५ शिखर परिषदेत, इराणने सदस्य देशांसमोर नाटोसारख्या सुरक्षा युतीची कल्पना मांडली आहे. या युतीचे उद्दिष्ट केवळ लष्करी आक्रमण आणि दहशतवादाचा सामना करणे नाही, तर पाश्चात्य देशांच्या दबावापासून स्वातंत्र्य मिळवणे हेही आहे.
ऑगस्ट महिन्यात चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या एससीओ २०२५ परिषदेसाठी आधीच बैठकांची मालिका सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चीनमध्ये पार पडलेल्या एका बैठकीत आपली रणनीती सादर केली. त्यांच्या मते, सदस्य देशांनी एकत्र येऊन एक कायमस्वरूपी सुरक्षा समन्वय यंत्रणा तयार करावी, जी लष्करी आक्रमण, दहशतवादी कारवाया आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या उल्लंघनावर कठोर उपाययोजना करेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
सध्या एससीओमध्ये भारत, चीन, रशिया, इराण, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस हे १० देश आहेत. बेलारूस २०२४ मध्येच सदस्य झाला, त्यामुळे हा गट अधिक प्रभावशाली बनत चालला आहे.
अराघची यांनी आपल्या भाषणात तेहरान, बीजिंग आणि मॉस्को यांच्यातील वाढती जवळीक अधोरेखित केली. गेल्या काही महिन्यांतील इस्रायलविरोधातील संघर्षामुळे इराण आणि चीन-रशिया यांच्यातील संबंध अधिक बळकट झाले आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर लादण्यात आलेले निर्बंध.
चीनच्या आर्थिक पाठिंब्यामुळे इराणला लष्करी आणि आर्थिक स्वावलंबन मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या नाटोच्या तोडीस तोड अशी एक युती उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संघटनेद्वारे सदस्य देश एकमेकांना संकटाच्या वेळी सैन्य पाठवून मदत करू शकतील. यामुळे इस्रायलसारख्या देशांसाठी हे एक मोठे सामरिक आव्हान ठरू शकते.
या हालचालीमुळे अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांमध्ये चिंता वाढली आहे. एससीओ सदस्य देश जर या प्रस्तावाला पाठिंबा देतात, तर जगात दोन स्वतंत्र आणि शक्तिशाली सुरक्षा गट अस्तित्वात येतील एक नाटो आणि दुसरा संभाव्य ‘ईस्टर्न सिक्युरिटी ब्लॉक’.
इराणसाठी एससीओसारखा बहुपक्षीय गट राजनैतिक एकाकीपणातून बाहेर पडण्याची संधी आहे. अलीकडेच ब्राझीलमध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत इराणच्या अणु कार्यक्रमावर झालेल्या हल्ल्यांवर चीन आणि रशियाने जाहीर पाठिंबा दर्शवला होता. या पाठिंब्यामुळे इराणला नव्याने जागतिक राजकारणात स्थान मिळू लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Syria सीमावादाने धारण केलं उग्र रूप! ‘आता अल-शारा यांना संपवा…’ नेतन्याहूंच्या मंत्र्यांची थेट धमकी
इराणची ही योजना केवळ सामरिक नव्हे तर जिओपॉलिटिकल स्तरावरही मोठा प्रभाव टाकू शकते. जर SCO च्या १० देशांनी यावर एकमताने सहमती दर्शवली, तर ही नवीन संघटना जगातील सामरिक संतुलन बदलू शकते. इस्रायल आणि अमेरिकेसाठी ही एक अलर्ट कॉल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.