Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War: ‘1 तासात 7 दावे आणि सातही खोटे…’, Donald Trump वर भडकले इराण; Hormuz बाबत मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणसोबत करार होईपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीची नौदल नाकेबंदी कायम राहील. त्यावर इराणी प्रवक्त्याने उत्तर दिले, "जर हे असेच चालू राहिले, तर आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करू."

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 18, 2026 | 11:31 AM
होर्मुझवरून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प - इराणमध्ये बिनसले? (फोटो सौजन्य - Social Media)

होर्मुझवरून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प - इराणमध्ये बिनसले? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण युद्ध पुन्हा धुमसणार?
  • डोनाल्ड ट्रम्पचे दावे खोटे असल्याचा इराणचा दावा 
  • पुन्हा एकदा इराण ट्रम्पवर कडाडले
अमेरिका इराण युद्ध थांबविण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरू असताना इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, जर अमेरिकेची नौदल नाकेबंदी सुरूच राहिली, तर तेहरान होर्मुझची सामुद्रधुनी बंद करेल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नाकेबंदीची पूर्ण अंमलबजावणी जाहीर केल्यानंतर लगेचच हा इशारा देण्यात आला.

गालिबाफ यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, होर्मुझमधून होणारी वाहतूक केवळ निश्चित मार्गांनी आणि इराणच्या परवानगीनेच होईल. ते म्हणाले, “जर नाकेबंदी सुरूच राहिली, तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणार नाही.” सध्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. नक्की कोणत्या देशात आणि कशा पद्धतीने याची चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता पुन्हा एकदा नव्याने ही गोष्ट समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत असल्याचा आता इराणकडून दावा करण्यात आला आहे. 

۱- رئیس جمهور آمریکا در یک ساعت هفت ادعا مطرح کرد که هر هفت ادعا کذب است.
۲- با این دروغگویی‌ها در جنگ پیروز نشدند و حتما در مذاکره هم راه به جایی نخواهند برد.
۳- با ادامهٔ محاصره، تنگهٔ هرمز باز نخواهد ماند.
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 17, 2026

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

अब्बास अराघची काय म्हणाले?

इराणने युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली असल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांनी ही घोषणा करण्यात आली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, “लेबनॉनमधील युद्धविरामामुळे, या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांची वाहतूक युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी पूर्णपणे खुली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.”

होर्मुझ नाकेबंदी कायम राहील: ट्रम्प

यावर प्रतिक्रिया देताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणसोबत करार होत नाही, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नौदल नाकेबंदी कायम राहील. मात्र, त्यांनी दावा केला की ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल कारण अडथळ्यांवर आधीच चर्चा झाली आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर करार झाला नाही, तर अमेरिका पुन्हा बॉम्बहल्ला सुरू करू शकते. ते म्हणाले, “मी कदाचित मुदतवाढ देणार नाही, पण इराणी बंदरांवरील नाकेबंदी सुरूच राहील. दुर्दैवाने, आम्हाला पुन्हा बॉम्बहल्ला सुरू करावा लागेल.”

Hormuz Strait : जगाची जीवनवाहिनी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा प्रवाहित! पण ट्रम्प यांच्या ‘या’ एका इशाऱ्याने तणावाचे वातावरण

इराणी वक्त्याने हे उत्तर दिले

इराणी वक्त्याने स्पष्टपणे सांगितले, “ते (ट्रम्प) या खोट्या गोष्टींनी युद्ध जिंकले नाहीत आणि वाटाघाटींमध्येही त्यांना काहीही मिळणार नाही. सामुद्रधुनी खुली राहील की बंद आणि तिचे नियम जमिनीवरील वास्तवानुसार ठरवले जातील, सोशल मीडियानुसार नाही.” गालिबाफ यांनी आरोप केला की ट्रम्प यांनी एका तासात सात दावे केले, जे सर्व खोटे होते. मात्र, ते दावे नेमके काय होते हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

Web Title: Us iran war donald trump close strait of hormuz claim 7 promises all fake warned by tehran speaker mohammad bagher ghalibaf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
1

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

US Canada Trade : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! कॅनडावर फोडला टॅरिफ बॉम्ब; व्यापारयुद्ध पेटणार?
2

US Canada Trade : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! कॅनडावर फोडला टॅरिफ बॉम्ब; व्यापारयुद्ध पेटणार?

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
3

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

US-Iran War : अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर ट्रम्प आक्रमक; इराणला किंमत मोजावी लागणार
4

US-Iran War : अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर ट्रम्प आक्रमक; इराणला किंमत मोजावी लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.