
iran cluster bomb attack israel russia china involvement suspected
Iran Israel war cluster bomb attack 2026 : मध्यपूर्वेतील युद्ध आता अशा वळणावर पोहोचले आहे जिथून परतणे अशक्य वाटते. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने (US-Israel Iran War) आतापर्यंतचे सर्वात भीषण रूप धारण केले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, इराणने आता त्यांच्यावर ‘क्लस्टर बॉम्ब’ (Cluster Bombs) सज्ज असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. या प्रगत शस्त्रास्त्रांमुळे तेल अवीवसह इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये हाहाकार माजला असून, या तंत्रज्ञानामुळे जागतिक महासत्तांमधील ‘शस्त्र युद्धा’चे नवीन पैलू समोर येत आहेत.
इराणची ही नवीन क्षेपणास्त्रे अत्यंत धूर्तपणे काम करतात. ही क्षेपणास्त्रे जमिनीला धडकण्यापूर्वीच हवेत ४ ते ७ किलोमीटर उंचीवर असताना फुटतात. स्फोट होताच त्यातून डझनावारी लहान-लहान बॉम्ब (Submunitions) बाहेर पडतात आणि मोठ्या क्षेत्रावर पसरतात. हे तंत्रज्ञान इतके घातक आहे की, एखादे साधे क्षेपणास्त्र एका इमारतीला लक्ष्य करते, पण क्लस्टर बॉम्ब संपूर्ण परिसर किंवा नागरी वस्ती उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतो. तेल अवीवजवळील अझोर शहरात एका घरात अशाच प्रकारे बॉम्बचा वर्षाव झाला, ज्यामुळे काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून
इराणने इतके प्रगत तंत्रज्ञान स्वतः विकसित केले असेल, यावर इस्रायलचा विश्वास नाही. इस्रायली लष्करी तज्ज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान रशिया किंवा चीनकडून इराणला मिळाले असावे. युक्रेन युद्धात रशियाने अशा प्रकारच्या क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचे पुरावे यापूर्वी समोर आले आहेत. रशियाने इराणला ड्रोन आणि क्षेपणास्त्र विकसित करण्यात मदत केल्याच्या चर्चा आधीपासूनच होत्या, पण आता क्लस्टर बॉम्बच्या प्रत्यक्ष वापरामुळे या संशयाला बळकटी मिळाली आहे. चीनचे वाढते लष्करी सहकार्य देखील इस्रायलसाठी चिंतेचा विषय बनले आहे.
Iran just deployed cluster munitions over Tel Aviv. One missile. 80 clusters. This cannot be intercepted. No air defense system on earth was built for this.#Iran #IranWar #IranIsraelWar #Isreal #USAirForce #TrumpEpsteinFiles #war #HypersonicMissiles #Zelensky pic.twitter.com/WIeiZzIAci — L4MBO (@L4MBODOTCOM) March 6, 2026
credit – social media and Twitter
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या क्लस्टर हल्ल्यांनी इस्रायलमध्ये मृत्यूचे तांडव उभे केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ११ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, तर १००० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक लहान बॉम्ब जमिनीवर पडल्यानंतर लगेच फुटत नाहीत, जे लहान मुलांसाठी किंवा बचाव पथकांसाठी ‘टाईम बॉम्ब’ ठरत आहेत. इराण आता एकाच वेळी मोठा हल्ला करण्याऐवजी, अशा प्रकारच्या अचूक आणि विखुरलेल्या हल्ल्यांनी इस्रायलमध्ये दहशत निर्माण करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US War: लाटांवर धुराचे साम्राज्य! अमेरिकेने इराणचं महाकाय ‘ड्रोन कॅरियर’ उडवलं; ‘Shahid Bagheri’ जळून खाक, पाहा VIRAL VIDEO
२००८ मध्ये जगात एका आंतरराष्ट्रीय कराराद्वारे क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, धक्कादायक वास्तव हे आहे की, इराण, इस्रायल आणि अगदी अमेरिका देखील या कराराचा भाग नाहीत. यामुळे या शस्त्रांच्या वापराला रोखण्यासाठी कोणतेही कायदेशीर बंधन उरलेले नाही. इराणची ही वाढती लष्करी ताकद केवळ इस्रायलसाठीच नाही, तर संपूर्ण जगाच्या शांततेसाठी एक मोठा धोका बनली आहे. जर हे तंत्रज्ञान रोखले गेले नाही, तर हे युद्ध रशिया-चीन विरुद्ध अमेरिका-इस्रायल अशा महायुद्धाकडे वळण्याची शक्यता आहे.
Ans: क्लस्टर बॉम्ब हे असे क्षेपणास्त्र आहे जे हवेतच फुटून त्यातून शेकडो लहान बॉम्ब बाहेर टाकते. हे बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर पसरतात, ज्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते.
Ans: क्लस्टर बॉम्बचे तंत्रज्ञान अत्यंत जटिल आहे. रशियाने युक्रेन युद्धात याचा वापर केला असल्याने आणि इराणचे या देशांशी वाढते लष्करी संबंध पाहता हा संशय व्यक्त केला जात आहे.
Ans: होय, २००८ च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार १११ देशांनी यावर बंदी घातली आहे. मात्र, इराण, इस्रायल आणि अमेरिका या कराराचे सदस्य नाहीत.