इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
इराणच्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचा हल्ला केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित नाही. भविष्यात इराणच्या आर्थिक आणि उर्जा केंद्रांना लक्ष्य केले जाऊ शकते. असे झाल्यास इराण गप्प बसणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यांवर जबाबी कारवाई करु असे इराणने म्हटले आहे.
इराणने मध्यपूर्व प्रदेशातील अमेरिकेच्या क्षेत्री संरक्षणांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. शिवाय अमेरिकेशी संबंधित आर्थिक कंपन्यांवर हल्ल्याचीही धमकी दिली आहे. यामध्ये आखाती देशांमधील तेल आणि वायू प्रकल्पांचा समावेश असून शकतो.
इराणसाठी खर्ग बेट धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जाते. इराणच्या एकूम कच्चा तेल निर्यायातीच्या जवळपास ९०% टक्के व्यापार या बेटावरुन होतो. अशा परिस्थिती अमेरिकेने बेटावरील उर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यास इराणची तेल निर्यात पूर्णपणे ठप्प होऊ शकते. याचा जागतिक तेल बाजारपेठेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेलाच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
याच परिस्थिती दरम्यान राणने सौदी अरेबियातील अत्यंत महत्त्वाच्या प्रिन्स सुलतान हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या ५ इंधन भरणारी विमाने उद्ध्वस्त झाली आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेने मध्यपूर्वेत 2500 अतिरिक्त सैन्य तैनात केले आहेत. तसेच एक एम्फीबियस असॉल्ट शिप तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या हालचालींमुळे युद्धाचा धोका प्रचंड वाढला आहे.
इराणच्या इशाऱ्यानंतर परिस्थितीत नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामध्ये आखाती क्षेत्रातील तेल आणि गॅस पाइपलाईन्स धोक्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण जगाला इंधम टंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची भिती आहे.
Ans: खर्ग बेट हे इराणसाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जाते. या बेटावरुन इराणच्या एकूण कच्चे तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात या बेटावरुन होते. दररोज लाखो बॅरल्स तेल जागतिक बाजारात पाठवले जातात.
Ans: इराणने, खर्ग बेटावर लष्करी तळावर अमेरिकी हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेला चेतावणी दिली आहे की,उर्जा आणि आर्थिक ठिकाणांवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल.
Ans: खर्ग बेटावरील इराणच्या उर्जा सुविधांवर हल्ला झाल्या, इराणचा तेल निर्यात थांबू शकते. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन किंमती वाढू शकतात.






