Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मोठी गॅसवाहू जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून होर्मुझ स्ट्रेटमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इराणने होर्मुझ खाणीत अमेरिका(America)-इस्रायल (Israel) आणि आखीत देशांची जहाजे अडवून धरली आहेत. पण याच वेळी भारताच्या जहाजांना सुरक्षित जाण्याची परवानगी दिली आहे. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) ची भारताच्या ध्वजाखालील दोन LPG टँकर जहाजे भारताकडे आज रवाना झाली आहे. भारताच्या इराणसोबतच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी(१३ मार्च २०२६) भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना रोखले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. यानंतर नंदा देवी आणि शिवालिक ही दोन महत्त्वाची LPG टँकर्सने सुरक्षितपणे होर्मुझ खाडी पार केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारताने इराणशी सतत संपर्कात राहून आपली जहाजे सुरक्षित केली आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी २८ फेब्रुवारी, ०५ मार्च, १० मार्च, आणि १२ मार्च असे चार वेळा संपर्क साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी गुरुवारी (१२ मार्च २०२६) फोनवरुन चर्चा केली होती.
नंदा देवी आणि शिवालिक जहाजांवर सुमारे ४६,००० मेट्रिक टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) आहे. भारताच्या घरगुती आणि औद्योगिक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ही खेप अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या जहाजांनी शुक्रवारी रात्री उशिरा होर्मुझ स्ट्रेट सुरक्षितपणे ओलांडला असून भारतीय नौसेनेच्या युद्धनौका या जहाजांना संरक्षण देत आहेत.
या जहाजांना मुंबई किंवा कांडला बंदरावर आणण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ही जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहचण्याची शक्यता आहे. भारत LPGसाठी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून आहे. युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस टंचाई निर्माण झाली होती. परंतु जहाजे सुरक्षित परतत असल्याने भारताची गॅस टंचाई दूर होणार आहे. सध्या इतर अनेक देशांची जहाजे होर्मुझ खाडीत अडकली आहेत. यामुळे जागतिक बाजारात इंधन आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे.
Ans: सरकारी सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदा देवी आणि शिवालिक हे दोन गॅसवाहू जहाजे पुढील दोन दिवसांत मुंबई किंवा कांडला बंदरावर पोहोचतील.
Ans: होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या काही दिवसांपासून इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या संपर्कात होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला होता. या राजनैतिक हालचालीमुळे भारताची जहाजे सुखरुप बाहेर पडली आहेत.






