Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kheibar Shekan: ऐतिहासिक नावाचे आधुनिक विध्वंसक इराणचे ‘ते’ घातक क्षेपणास्त्र; ज्याने US पॅट्रियट यंत्रणेचा केला कचरा

इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हा हल्ला 'खैबर शिकान' बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आला, ज्याचा पल्ला सुमारे १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे आणि वजन फक्त ४.५ टन आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 16, 2026 | 05:25 PM
iran kheibar shekan ballistic missile attack us air base jordan mach 12 patriot defense failure

iran kheibar shekan ballistic missile attack us air base jordan mach 12 patriot defense failure

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन तळावर थरकाप
  • हायपरसॉनिक वेग आणि पॅट्रियट यंत्रणा निकामी
  • कमी वजन आणि अफाट मारक क्षमता

Kheibar Shekan ballistic missile Iran : मध्यपूर्वेतील युद्धाची धग आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचली आहे. इराणने जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या हवाई तळाला लक्ष्य करत पुन्हा एकदा मोठा हल्ला चढवला आहे. या भीषण हल्ल्यासाठी इराणने आपल्या ताफ्यातील सर्वात आधुनिक, वेगवान आणि अचूक मारा करणाऱ्या ‘खैबर शिकान’ (Kheibar Shekan) या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. इराणी प्रसारमाध्यमे आणि तेथील रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) केलेल्या दाव्यानुसार, हा हल्ला म्हणजे अमेरिकेने केलेल्या कारवायांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे. या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन नसर-२’ च्या आठव्या टप्प्याचा भाग म्हणून ‘या झैनब कुब्रा (s)’ हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. या द्विटप्पी हल्ल्यात जॉर्डनमधील अल-अझराक हवाई तळावरील लढाऊ विमानांच्या देखभालीचा रॅम्प आणि अमेरिकेचे नवीन कमांड आणि कंट्रोल सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा आयआरजीसीने केला आहे.

या यशस्वी हल्ल्यानंतर संपूर्ण जगाचे आणि विशेषतः संरक्षण तज्ञांचे लक्ष इराणच्या या ‘खैबर शिकान’ क्षेपणास्त्राकडे गेले आहे. या क्षेपणास्त्राचे नाव अत्यंत ऐतिहासिक असलेल्या ‘खैबर युद्धा’वरून ठेवण्यात आले आहे. अरबी भाषेमध्ये ‘खैबर शिकान’ याचा अर्थ ‘खैबर किल्ल्याचा विध्वंसक’ असा होतो. हे इराणच्या तिसऱ्या पिढीतील मध्यम पल्ल्याचे (Medium-Range Ballistic Missile) सर्वात प्रगत आणि घातक क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राने केवळ अमेरिकेच्या पॅट्रियट संरक्षण प्रणालीलाच (Patriot Air Defense System) चकमा दिला नाही, तर आखाती देशांमधील लष्करी समतोलाचे समीकरणही बदलून टाकले आहे.

‘खैबर शिकान’ क्षेपणास्त्र इतके प्राणघातक आणि धोकादायक का आहे?

या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आणि त्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तांनाही यावर मात करणे कठीण जात आहे.

    • अचूक आणि लांब पल्ल्याचा मारा: खैबर शिकानची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची १,४५० किलोमीटर (सुमारे ९०० मैल) अंतराची मारक क्षमता आहे. या कक्षेमध्ये संपूर्ण इस्रायल देश आणि आखाती देशांमध्ये पसरलेले अमेरिकेचे सर्व प्रमुख लष्करी व हवाई तळ येतात. म्हणजेच, इराण आपल्या भूमीवरून बटन दाबून इस्रायलच्या कोणत्याही शहराला किंवा अमेरिकेच्या तळाला क्षणात उद्ध्वस्त करू शकतो.
    • अल्ट्रा-फास्ट घन इंधन तंत्रज्ञान: हे क्षेपणास्त्र ‘सॉलिड फ्युएल’ म्हणजेच घन इंधनावर चालते. द्रव इंधनाच्या क्षेपणास्त्रांना प्रक्षेपणासाठी सज्ज होण्यास तासनतास लागतात, परंतु खैबर शिकान अवघ्या १५ मिनिटांपेक्षा कमी वेळात डागण्यासाठी तयार करता येते. यामुळे उपग्रहाद्वारे (Satellites) त्याचा माग काढणे शत्रूला अशक्य होते. तसेच, याची वाहतूक करणे आणि ते लपवून ठेवणे अत्यंत सोपे आहे.
    • मॅक १२ चा हायपरसॉनिक वेग: हवेत झेपावल्यानंतर या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तब्बल १२ पट अधिक (सुमारे १९,५०० किलोमीटर प्रति तास) होतो. या प्रचंड हायपरसॉनिक वेगामुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला या क्षेपणास्त्राचा शोध घेणे आणि त्याच्यावर प्रतिहल्ला करणे यासाठी अजिबात वेळ मिळत नाही.
  • हवेत दिशा बदलण्याची अद्भुत क्षमता (Maneuverability): या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘अंतिम टप्पा’ (Terminal Phase) होय. जेव्हा हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या जवळ पोहोचते, तेव्हा ते सरळ रेषेत न जाता हवेमध्ये नागमोडी वळणे घेत आपली दिशा बदलते. या चकवणाऱ्या हालचालीमुळे अमेरिकेची सर्वात महागडी आणि प्रगत समजली जाणारी ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-UkraineWar: 2,000 किमी लांब पळाले रशियन आरमार; नौदलाची समुद्रातून मानहानीकारक पळापळ, युक्रेनसमोर महासत्तेची मोठी घसरण

  • संमिश्र पदार्थांमुळे वजनाने हलके: खैबर शिकान हे वजनाने अवघे ४.५ टन आहे. संमिश्र पदार्थांचा (Composite Materials) वापर केल्यामुळे त्याचे वजन नेहमीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच कमी झाले आहे. वजनाने हलके असूनही, ते ५५० किलोग्रॅम वजनाचा अत्यंत विनाशकारी दारुगोळा आणि स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे.

 

Footage, reportedly taken during Iranian drone and missile strikes against Kuwait earlier, shows a Shahed-136 impact. The U.S. continues to trade strikes with Iran, as targets inside Bahrain and Kuwait are now bearing the brunt of Iranian fires. pic.twitter.com/AC07mtqi96 — OSINTdefender (@sentdefender) July 15, 2026

credit – social media and Twitter

  • सामान्य ट्रकवरून प्रक्षेपण: हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी कोणत्याही विशेष किंवा मोठ्या लष्करी लाँचरची गरज नसते. कोणत्याही सर्वसामान्य १०-चाकी व्यावसायिक ट्रकवर याचे लाँचर लादून ते थेट महामार्गावरून किंवा दुर्गम भागातून डागता येते. यामुळे युद्धाच्या वेळी हे लाँचर्स शोधून नष्ट करणे अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई दलासाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jagannath Rath Yatra: हातात पाकिस्तानी झेंडा आणि मुखात हरिनाम! कराचीमध्ये रंगला हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव; VIDEO होतोय खूप VIRAL

इराणचा क्षेपणास्त्र साठा आणि युद्धाची रणनीती

सामरिक तज्ञांच्या अंदाजानुसार, युद्धापूर्वी इराणकडे सुमारे ३,००० ते ४,००० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा प्रचंड मोठा साठा होता. सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराण आपल्या या साठ्याचा अत्यंत नियोजनबद्ध आणि धोरणात्मक वापर करत आहे. शत्रूची महागडी हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense Systems) पूर्णपणे थकून आणि संपवून टाकण्यासाठी इराण एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा करतो.

यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये इस्रायलवर केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणने एकाच वेळी १८१ क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यामध्ये खैबर शिकानचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. अलीकडेच झालेल्या ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’च्या २२ व्या लाटेचा भाग म्हणून इराणने पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेला आता आखाती देशांमधील आपल्या सैनिकांच्या सुरक्षेची मोठी चिंता सतावत आहे.

Web Title: Iran kheibar shekan ballistic missile attack us air base jordan mach 12 patriot defense failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • iran
  • Iran War
  • Nuclear missiles

संबंधित बातम्या

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण
1

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण

US-Iranwar: मध्यपूर्वेत येणार विध्वंसक वादळ? ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर इराणने फुंकले रणशिंग; केले युद्धाची चाहूल देणारे मोठे वक्तव्य
2

US-Iranwar: मध्यपूर्वेत येणार विध्वंसक वादळ? ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर इराणने फुंकले रणशिंग; केले युद्धाची चाहूल देणारे मोठे वक्तव्य

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
3

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
4

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.