
फोटो सौजन्य AI
तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी उद्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे . ट्रम्प यांची अमेरिकेत खालावलेली प्रतिभा आणि अमेरिकेला उगाच इराणच्या युद्धात ओढल्याचा राग यामुळे अमेरिकेत जनतेत असंतोष आहे . यामुळे ट्रम्प यांना अमेरिकेतील काँग्रेसमध्ये मोठा फटका बसण्याची चर्चा सुरु आहे . याआधी नेतान्याहू यांनी इस्रायली लष्कर प्रमुखांना इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते ते त्यांनी नाकारले .
तेव्हा नेतान्याहू आणि ट्रम्प यांची राजकीय स्थिती बघता आता दोघांना स्वतःचा बचाव करण्यासाठी एक युद्ध हवे आहे . यामुळे ७ नोव्हेंबरला अमेरिका इराणवर अणुहल्ला करू शकते असा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध पत्रकार टकर कार्लसन याने केला आहे . तसेच या संबंधात म्हणजेच अजून एकदा तरी मोठे युद्ध होणार अशा चर्चा जगभरात विश्लेषक करत होतेच .
इराण अमेरिका संघर्ष पुन्हा धोकादायक वळणावर जाऊ शकतो . अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार टकर कार्लसन यांनी केलेल्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे . इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणविरोधात अणुहल्ला करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप कार्लसन यांनी केला आहे . त्यांच्या मते इराणमधील भूमिगत अणूसंवर्धन केंद्राला लक्ष करण्याचा पर्याय अमेरिकेसमोर ठेवण्यात आला आहे . ट्रम्प यांना ७ नोव्हेंबर पर्यंत अण्वस्त्र वापराबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो . असेही त्यांनी म्हंटले आहे .
Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
कार्लसन यांनी आपल्या सोशल मीडियावर मध्य इराणमधील पिकॅक्स माउंटन या भूमिगत ठिकाणाचा उल्लेख केला आहे . या परिसरात इराणने पुन्हा युरेनियम संवर्धन सुरु केल्याचा इस्रायली गुप्तचर यंत्रणांचा दावा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे . हे केंद्र जमिनीखाली खोलवर असून आत्तापर्यंत अमेरिका आणि इस्रायलने त्यावर प्रचंड हल्ले केले आहेत तरी ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत .
कारण त्याच्या संरक्षणासाठी मजबूत ग्रॅनाईट खडक तिथे असल्याचा दावा कार्लसन यांनी केला आहे . त्यामुळे पारंपरिक शस्त्रांनी या केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण असल्याने अण्वस्त्र हाच एकमेव पर्याय असल्याचे कार्लसन यांनी सांगितले आहे . मात्र त्यांनी द्यावाला खरे ठरवणारे पुरावे सार्वजनिक केले नाहीत . तसेच अमेरिका किंवा इस्रायलने या हल्ल्याची देखील पुष्टी केली नाही .
इराणने आपले ६० टक्के युरेनियम हे आधीच नॉर्थ कोरियाला दिले असल्याचे बोलले जात आहे . नॉर्थ कोरिया इराणला अणुबॉम्ब बनवण्यासाठी मदत करत असल्याचा देखील संशय जगभरात घेतला जातो . तर दुसरीकडे इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आपल्या सर्व लष्कराला आधीच आदेश दिले आहेत कि इराणवर हल्ला झाल्यास कोणत्याही आदेशाची वाट न बघता ताबडतोब आणि समोर कोण आहे याची तमा न बाळगता जश्यास तसे उत्तर द्यावे .
जर रंगलेल्या चर्चेप्रमाणे अमेरिकेने इराणवर अणुहल्ला केलाच तर इराणसुद्धा त्याला जोरदार प्रतिहल्ला करायला अजिबात मागेपुढे बघणार नाही . इराणवरील अणुहल्ल्यानंतरचे जग आणि त्याची राजकीय ,सामाजिक तसेच सर्वच बाबतीत असणारी घडी ही एका आपण कल्पनाच नसलेल्या टोकाला जाणार आहे . हे मात्र नक्की आहे .