Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War: आज रात्री ‘तबाही’ अटळ? Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार; चर्चेचे सर्व दरवाजे कायमचे बंद!

अमेरिका आणि इस्रायलने मंगळवारी संध्याकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर संयुक्तपणे भीषण बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबतचे चर्चेचे सर्व दरवाजे अधिकृतपणे बंद केले असून जगावर महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 09:10 PM
आज रात्री 'तबाही' अटळ? Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार (Photo Credit- Ai)

आज रात्री 'तबाही' अटळ? Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

  • आज रात्री ‘तबाही’ अटळ?
  • Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार
  • चर्चेचे सर्व दरवाजे कायमचे बंद!
World War 3: आखाती देशांमधील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच, अमेरिका आणि इस्रायलने मंगळवारी संध्याकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर संयुक्तपणे भीषण बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबतचे चर्चेचे सर्व दरवाजे अधिकृतपणे बंद केले असून जगावर महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.

चर्चेचे सर्व मार्ग बंद; इराणचा मोठा निर्णय

इराणी प्रसारमाध्यम ‘तेहरान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक (Diplomatic) आणि अप्रत्यक्ष चर्चेचे मार्ग (Indirect Channels) पूर्णपणे थांबवले आहेत. कोणत्याही प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाण करण्यावरही इराणने बंदी घातली आहे. “आता चर्चेची वेळ संपली असून परिस्थिती केवळ संघर्षाकडे जात आहे,” असा पवित्रा इराणने घेतला आहे.

ट्रम्प यांचे खळबळजनक विधान

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर इराणला उद्देशून एक अत्यंत गंभीर आणि सूचक पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी लिहिले की, “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती संपुष्टात येईल. मला असे घडावे असे वाटत नाही, पण कदाचित ते घडेल. मात्र, आता तिथले शासन बदललेले असून ते पूर्वीपेक्षा अधिक समंजस आणि कमी कट्टरपंथी आहे, त्यामुळे कदाचित काहीतरी विलक्षणही घडू शकते. जगाच्या प्रदीर्घ आणि कठीण इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण ठरेल. ४७ वर्षांची खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यूचा खेळ आज रात्री संपेल. ईश्वर इराणच्या महान जनतेवर कृपा करो!”

Middle East War : ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर नाही? प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच दिला अमेरिकेच्या विनाशाचा इशारा

इराणचा ‘रेड लाईन’ ओलांडल्यास भीषण प्रतिहल्ल्याचा इशारा

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) कठोर भूमिका मांडली आहे. इराणने म्हटले आहे की, जर अमेरिकन “दहशतवादी” सैन्याने आमची ‘रेड लाईन’ ओलांडली, तर आमचा प्रतिसाद केवळ या क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. इराणने स्पष्ट केले की, आम्ही आतापर्यंत केवळ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, पण जर आमच्या नागरी सुविधांवर हल्ले झाले, तर आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यास अजिबात संकोच करणार नाही. अमेरिकेला साथ देणाऱ्या शेजारील देशांनाही इराणने इशारा दिला आहे. “आतापर्यंत आम्ही चांगला शेजारी म्हणून संयम पाळला होता, पण आता आमच्या मनातील सर्व संकोच दूर झाला आहे,” असे IRGC ने म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामांची भीती

होर्मुजची सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. आधीच कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या पार गेल्या असताना, आज रात्री होणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे आणि शेअर बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.

US Iran War : ‘मी बलिदान देण्यास सज्ज…’ , ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी राष्ट्राध्यक्षांची ठाम भूमिका; जनताही आहुती देण्यास तयार?

Web Title: Iran refuses to yield even after donald trumps latest threat all doors to dialogue permanently closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • iran
  • Iran US Israel
  • World War 3

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
2

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
3

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
4

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.