Middle East War : ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर नाही? प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच दिला अमेरिकेच्या विनाशाचा इशारा (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू पुरवठा मार्ग असलेला हा जलमार्ग फेब्रुवारी अखेरपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जवळपास बंद आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी मदत न करणाऱ्या युरोपियन आणि नाटो मित्रदेशांवरही ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे खासदार बर्नी सँडर्स यांनी ट्रम्प यांचे विधान ‘धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या असंतुलित’ असल्याचे सांगत अमेरिकन कॉंग्रेसने हे युद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊराच्या अगदी जवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ‘लाफायेट पार्क’ जवळ मध्यरात्री ही घटना पहली तेव्हा राष्ट्राध्यक्ष दमा व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. सीक्रेट सव्र्हिसने परिसराची झडती घेतली असून, सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
डेमोक्रेटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सिनेट सदस्य चक शुमर यानी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत त्याला ‘एका असंतुलित व्यक्तीची बडबड म्हटले आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे मित्रदेश अमेरिकेपासून दूर जात आहेत. ट्रमा यांच्या माजी सहकारी मार्जरी टेलर ग्रीन यांनीही म्हटले की राष्ट्राध्यक्ष सध्या ‘वेडापिसा वागत आहे.
युद्धाचा कायमस्वरूपी अंत हवा असल्याचे सांगत इराणने अमेरिकेचा तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव सोमवारी फेटाळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वीच इराणने ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे टेन्शन वाढले आहे.
इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने पाकिस्तानमार्फत पाठवलेला प्रस्ताव इराणने फेटाळला. कैरोमधील इराणच्या राजनैतिक मिशनचे प्रमुख मोजतबा फिरदोसी पोर यांनी सोमवारी सांगितले, “आम्ही केवळ युद्धविराम स्वीकारणार नाही. आमच्यावर पुन्हा हल्ला होणार नाही, याची हमी मिळाल्यासच आम्ही युद्धबंदी स्वीकारू, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील महत्त्वाच्या सागरी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमानचे अधिकारी एक यंत्रणा विकसित करण्यावर काम करत आहेत.






