Iran rejects Nuclear Talk with America
Iran Rejects Nuclear Talk with America : तेहरान : इराणच्या (Iran) अणु कार्यक्रमावरुन पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इराणच्या अणु कार्यक्रमावर पुन्हा निर्बंध लादण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे इराणने संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेशी (America) न्यूक्लियर प्रकल्पावर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे.
इराणचे सर्वाच्च नेते अयातुलला अली खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेशी अणु कार्यक्रमावर थेट चर्चेसाठी नकार दिला आहे. इराणच्या मते, यामुळे त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लादले जातील. यामुळे इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच सध्या संयुक्त राष्ट्र देखील इराणवर निर्बंध लादण्याची भीती त्यांना व्यक्त केला आहे.
अली खामेनेई यांनी म्हटले की, अमेरिका त्यांच्यावर अणु कार्यक्रम बंद करण्यास दबाव टाकत आहे. पण इराण कोणत्याही परिस्थिती दबावाला बळी पडणार नाही आणि त्यांच्या अणु कार्यक्रम बंद करणार नाही. खामेनेईंच्या मते, या चर्चांमुळे केवळ त्यांचा वेळ वाया जात असून आहे. या चर्चामधून इराणला त्यांचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. उलट इराणला गंभीर नुकसान भोगावे लागेल, असे खामेनेईंनी म्हटले.
नुकतेच युरोपीय देशांमी देखील इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कडक नजर ठेवण्याची आणि कठोर निर्बंध लादण्याची मागणी संयुक्त राष्ट्रात केली होती. यावेळी देखील इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कोणताही दबाव स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर खामेनेई यांनी पुन्हा एकदा इराण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले हे. इराणच्या सार्वभौमत्वासाठी ठाम राहिल.
याच वेळी इराणने अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहे. खामेनेईंनी म्हटले की, एका बाजूल अमेरिका इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला चर्चेचे ढोंग रचत आहेत. यामुळे अमेरकेच्या हेतूवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मते, इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करत आहे. यामुळे इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पण इराणने त्यांचा आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण आणि उर्जेपूपता मर्यादित असल्याचे म्हटले आहे. तसेच खामेनईंच्या विधानावरुन इराण कोणत्याही दबावाखाली चर्चेला तयार नाही हे स्पष्ट होते.
इराणने अमेरिकेसोबत अणु चर्चेला का नकार दिला?
इराणच्या सर्वाच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मते, अमेरिकेशी चर्चांमधून कोणताही फायदा त्यांना होत नाही, उलट त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे इराणने अमेरिकेशी थेट चर्चेला नकार दिला आहे.
अमेरिका आणि युरोपीय देशांनी इराणवर काय आरोप केला आहे?
अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मते, इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करत असल्याचा आरोप केला आहे.
H-1B Visa : एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक मोठा बदल ; लॉटरी सिस्टिम बंद करणार ट्रम्प