Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा

Iran Trade Crisis : दक्षिणेकडील बंदरांवरील व्यापारातील अडथळ्यांमुळे इराणने स्थलमार्गावरील व्यापाराचा आधार वाढवला आहे. त्यामुळे इराण-तुर्की सीमेवर मालवाहू ट्रकच्या किलोमीटरच्या रांगा लागल्या असून, आयातदारांसमोर वाहतूक वेळ आणि खर्च वाढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 05:40 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • दक्षिणेकडील बंदरांऐवजी स्थलमार्गावर व्यापाराचा भर
  • तुर्की सीमेवर ट्रकच्या किलोमीटरच्या रांगा
  • आयातदारांसमोर वाढलेला वाहतूक खर्च
Iran Trade Crisis : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालेले युद्ध अजून सुरूच आहे . इराण समोर अमेरिका हार मानायला तयार नाही आणि अमेरिकेसमोर इराण हार मानायला तयार नाही . तब्बल २११ दिवस पूर्ण झालेले आहेत . या युद्धाला या युद्धामुळे इराणमधील होर्मूझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली आहे . या सागरी मार्गातून जगाचा जवळपास २० टक्के माल वाहून नेहला जातो .

युद्धाची व्याप्ती वाढल्यावर आता सौदी विरुद्ध हुती अशी लढाई सुरु झाली . आणि हुतींनी लाल समुद्रातील दुसरा सागरी मार्ग म्हणजेच बाब अल मंदेब ही बंद करून टाकला आहे . होर्मूझ बंद केल्याने अमेरिकेने होर्मूझच्या प्रवेशद्वारावर ब्लॉकेड केले आहे .

त्यामुळे चीन वगळता इराणलाही कोणत्याही देशांसोबत व्यापार करण्यात अडचण निर्माण झाली आहे . या सगळ्या प्रकारामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली असून महागाई वाढली आहे . पण स्वतःला जगाचे पोलिसिंग करणारी फौज आणि तंत्रज्ञान असण्याचा गर्व असणारी अमेरिकेला इराणने मात्र घाम फोडला आहे .

पण खरं तर या सगळ्या जागतिक बदलत्या परिस्थीचा अमेरिकेवर मोठा असा काही फरक अजून तरी पडलेला नाही किंवा फरक पडला असेल तरी त्याच्या बातम्या तरी अजून जगात जास्त प्रमाणात प्रसारित झाल्या नाहीत . त्यामुळे असे म्हणावे लागेल कि अमेरिका तुपाशी आणि बाकी जग उपाशी .

पण दुसरीकडे मात्र अमेरिकेने इराणला टाईट करून सोडले आहे . जसं कि इराणच्या दक्षिणेकडील बंदरांवर व्यापारासाठी निर्माण झालेल्या निर्बंध आणि अडथळ्यांमुळे देशातील आयातदारांनी आता मालवाहतुकीसाठी स्थलमार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे. त्यामुळे इराण-तुर्की सीमेवर मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी या रांगा किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत.

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य

दक्षिणेकडील बंदरांऐवजी स्थलमार्गावर व्यापाराचा भर

इराणच्या परकीय व्यापारासाठी दक्षिणेकडील बंदरे महत्त्वाची मानली जातात. मात्र, निर्बंधांमुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे. तुर्कीमार्गे युरोप आणि इतर बाजारपेठांशी जोडणारे स्थलमार्ग त्यामुळे अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. परिणामी या मार्गावर मालवाहतुकीचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

तुर्की सीमेवर ट्रकच्या किलोमीटरच्या रांगा

व्यापाराचा मोठा हिस्सा स्थलमार्गाकडे वळल्याने इराण-तुर्की सीमेवरील सीमाशुल्क आणि तपासणी केंद्रांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने चालकांना सीमा पार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबाचा थेट परिणाम आयात होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठा साखळीवर होत आहे.

आयातदारांसमोर वाढलेला वाहतूक खर्च

दक्षिणेकडील बंदरांवरील अडथळ्यांमुळे स्थलमार्गाचा वापर वाढल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. लांब प्रतीक्षा, सीमाशुल्क प्रक्रिया आणि वाढलेले अंतर यामुळे माल पोहोचवण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढू शकतात. त्यामुळे इराणच्या व्यापार व्यवस्थेवर निर्बंधांचा परिणाम केवळ बंदरांपुरता मर्यादित न राहता आता देशाच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर दिसून येत आहे.

 

 

Web Title: Iran trade crisis impact of port restrictions kilometers long queues of trucks at the turkish border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
1

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
2

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
3

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.