
Iran Protest Paris Connection
मॅडम M म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरियम रजावी या फ्रान्स (France) मधील इराणविरोधी आंदलोनाचे नेतृत्व करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यामुळे इराणच्या खामेनेई सरकारची अस्वस्थता वाढली आहे. मरियम रजावी या नॅशनल कॉउन्सिल ऑफ रेजिस्टन्स ऑफ इराण (NCRI) च्या अध्यक्षा आहेत. १९९० पासून त्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी इराणविरोधी गटांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्या माजुहिदीन-ए-खालक (MEK) या संघटनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यामुळे या संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. परंतु या संघटनेला मिळणारा निधी आणि या संघटनांच्या कार्याबाबत अनेक तज्ज्ञांनी टीका केली आहे.
दरम्यान मरियम रजावी आणि MEK संघटनेवर इराणमधील आंदोलनाची सुत्रे, रणनीती पॅरीसमधून आखली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या इराणमध्ये आंदोलाने अधिक हिंसक रुप घेतले आहे. राजधानी तेहरानसह, इस्फाहन, शीराजसह, अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणाता अस्थिरता पसरली आहे. सुरक्षा दलांकडून कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत १० हजाराहून अधिकांना ताब्यात घेँण्यात आले आहे. तसेच सुरक्षा दलांच्या गोळीबारात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी २८ डिसेंबर २०२५ मध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली होती. परंतु अद्यापही हे आंदोलन आटोक्यात आलेले नाही.
या आंदोलनामागे मरियम रजावी यांचा वैयक्तिक आणि राजकीय हेतू असल्याचा दावा केला जात आहे. रजावी यांचे पीत MEK चे नेते मसूद रजावी २००३ नंतर गायब झाले आहेत. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक कथित दावे केले जात आहेत. त्याचा आरोप इराणवर असून यामुळेच हा संघर्ष केवळ राजकीय नसून वैयक्तिक भावनेशी जोडला जात आहे.
World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत
Ans: इराणमधील आंदोलनाचे नेतृत्व पॅरीसमधून मॅडम M म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरियम रजावी करत आहेत. त्या इराणच्या नॅशनल कॉउन्सिल ऑफ रेजिस्टन्स ऑफ इराण (NCRI) च्या अध्यक्षा आहेत.
Ans: माजुहिदीन-ए-खालक (MEK) मरियम रजावी यांच्या नेतृत्वाखालील एक संघटना असून ही संघटना इराणमधील आंदोलनाचे पॅरीसमधून रणनीती आखत असल्याचे म्हटले जात आहे.
Ans: मरियम रजावी यांचा हेतू केवळ खामेनेई सरकारला पाडणे नसून त्यांच्या पतीच्या मृत्यूचा बदला म्हणून आहे.