World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या 'या' देशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
मीडिया रिपोर्टनुसार, इराणमध्ये सध्या सुरक्षा दलांच्या गोळीबार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार प्रचंड वाढला आहे. दगडफेक आणि गोळीबार केला जात आहे. यामध्ये काही सरकारसमर्थ नागरिकही सहभागी झाले आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून रस्ते, सार्वजनिक ठिकाणे सगळे काही बंद आहे. शिवाय इंटरनेट आणि फोनसेवा बंद असल्याने घटनांची स्पष्ट माहिती मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने (America) इराणमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचे किंवा सुरक्षित ठिकाणी लपण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या दूतावासाने व्हर्च्युअल सुचना जारी करत आपल्या नागरिकांना इराण, आर्मानिया, तुर्की सोडून इतर देशांमध्ये जाण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे की, इराणमधील निदर्शने वाढत चालली आहेत आणि ती अधिक हिंसक होऊ शकतात. यामुळे अमेरिकन नागरिकांनी तातडीने इराणमधून बाहरे पडावे. तसेच दूतावासाशी संपर्क करण्यासाठी इंटनेट सोडून पर्यायी मार्ग शोधण्याचेही या सुचनेत सांगण्यात आले आहे.
दरम्यान मिडिया रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणवर हल्ला करण्याचे आदेश देणार असल्याचे संकेत मिळाले आहे. व्हाइट हाइसने संकेत दिले आहेत की, अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या प्रस्तांववर सध्या चर्चा करत आहेत. याच शिवाय अमेरिकेच्या B-52 बॉम्बर्स आणि इंधने भरणारी लष्करी विमाने इराणच्या जवळ पाहिली गेली आहेत. या हालचालींमुळे सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिका इराणवर लवकरच हल्ला करणार आहे. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल लागली आहे.
इराणवर आर्थिक दबाव
याशिवाय ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबावही वाढवला आहे. ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के कराची (Tarrif) घोषणा केली आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या तणावाचा जागतिक पातळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ
Ans: इराणमध्ये सध्या हिंसक निदर्शने सुरु आहेत. दगडफेक आणि वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेन नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिका इराणवरील हल्ल्याच्या पर्यायांवर चर्चा करत असल्याचे संकेत मिळाले आहे. तसेच इराणजवळ B-52 बॉम्बर्स आणि इंधने भरणारी लष्करी विमाने पाहिली गेली आहेत.
Ans: अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लागू केले आहे.






