Drone Warfare: रशियाची ड्रोनयुद्धात निर्णायक आघाडी; ८७,००० सैनिकांच्या ताफ्याने युरोपची झोप उडवली, ब्रिटीश सैन्य येणार गुडघ्यावर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Russia new drone army 87000 vs British army : युक्रेन युद्धाने (Russia and Ukraine war) जगाला आधुनिक युद्धाची एक नवीन व्याख्या शिकवली आहे आणि ती म्हणजे ‘ड्रोन’. आता रशियाने या क्षेत्रात अशी झेप घेतली आहे की, संपूर्ण युरोप आणि विशेषतः ब्रिटनचे धाबे दणाणले आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ८७,००० सैनिकांची एक नवीन आणि स्वतंत्र ‘ड्रोन आर्मी’ (Unmanned Systems Forces) तयार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही केवळ एका विभागाची सैन्यसंख्या ब्रिटनच्या संपूर्ण भूदलापेक्षा (British Army) १७,००० ने जास्त आहे.
अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ (ISW) च्या अहवालानुसार, रशियाने आपल्या या नवीन फोर्समध्ये एक पूर्ण रेजिमेंट, २५ बटालियन आणि तीन डिव्हिजनची निर्मिती केली आहे. मॉस्कोच्या ‘रुबिकॉन ड्रोन फोर्स’ आणि ‘बुर्सा-सरमत अनमॅन्ड सिस्टम्स स्पेशल सेंटर’ मध्ये दिवस-रात्र हजारो सैनिकांना अत्याधुनिक ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, रशियन ड्रोन युक्रेनमध्ये तोफखान्यापेक्षा जास्त नुकसान करत आहेत. हे केवळ युद्धाचे साधन राहिले नसून, आता ते रशियाचे मुख्य शस्त्र बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम
एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सैन्याची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ब्रिटीश सैन्यातील प्रशिक्षित सैनिकांची संख्या ७०,३०० पर्यंत खाली आली आहे. १८०३ नंतर, म्हणजेच गेल्या २०० वर्षांतील हा ब्रिटीश सैन्याचा सर्वात लहान आकार आहे. केवळ संख्याच कमी नाही, तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ब्रिटन मागे पडताना दिसत आहे.
Russia is now producing over 400 Shahed drones per day, Ukraine’s Commander‑in‑Chief General Syrskyi says. He added that Russia has formed dedicated unmanned systems forces of about 80,000 troops, with plans to expand to 165,500 in 2026 and nearly 210,000 by 2030. pic.twitter.com/UXXo632HMp — NOELREPORTS 🇪🇺 🇺🇦 (@NOELreports) January 6, 2026
credit – social media and Twitter
धक्कादायक वास्तव: ब्रिटीश सैनिकांना ड्रोन उडवण्याचा अनुभव मिळावा म्हणून एका चॅरिटी संस्थेला १०,००० पाउंड खर्च करावे लागले. याचा अर्थ ब्रिटीश सैनिक सध्या दान केलेल्या रेसिंग ड्रोनवर सराव करत आहेत. रशियाकडे ८७,००० ड्रोन तज्ज्ञ असताना, ब्रिटनकडे केवळ ३,००० सैनिकांना ड्रोनचे जुजबी प्रशिक्षण आहे.
#Russia has created a Drone Force (Unmanned Systems Force) as a new military branch; operational & administrative details awaited. pic.twitter.com/4rbbNFHOK3 — News IADN (@NewsIADN) November 15, 2025
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग
सशस्त्र दल मंत्री अल कॉर्न्स यांच्या मते, रशियाने युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रशियन ड्रोन आता केवळ टेहळणी करत नाहीत, तर ते आत्मघाती हल्ले (Kamikaze Drones) आणि अचूक बॉम्बफेक करण्यात तरबेज झाले आहेत. ब्रिटनने आता पुढील वर्षी ६,००० नवीन पायलट तयार करण्याचे लक्ष्य ठेवले असले तरी, रशियाच्या ८७,००० च्या फौजेसमोर हे प्रयत्न ‘उंटाच्या तोंडात जिरे’ सारखे वाटत आहेत. युरोपमधील सुरक्षा तज्ज्ञांना भीती आहे की, जर हा तणाव वाढला तर रशिया आपली ही अवाढव्य ड्रोन शक्ती युक्रेनच्या पलीकडे पोलंड किंवा बाल्टिक देशांविरुद्ध वापरू शकतो. पुतिन यांच्या या ‘ड्रोन क्रांती’ने युरोपला आता आपली संरक्षण रणनीती शून्यातून पुन्हा तयार करण्यास भाग पाडले आहे.
Ans: रशियाच्या नवीन 'अनमॅन्ड सिस्टम्स फोर्सेस'मध्ये ८७,००० पेक्षा जास्त सैनिक आहेत, जे ब्रिटीश भूदलाच्या (७०,३००) तुलनेत खूप जास्त आहेत.
Ans: सध्या केवळ ३,००० ब्रिटीश सैनिकांना ड्रोनचे प्रशिक्षण आहे, तर रशियाकडे या क्षेत्रातील ८७,००० तज्ज्ञ सैनिक आहेत. ब्रिटनचे सैन्य १८०३ नंतरच्या सर्वात लहान आकारात आहे.
Ans: ही रशियाची एक विशेष ड्रोन युनिट आहे, जी प्रगत ड्रोन तंत्रज्ञान, एआय (AI) आणि फायबर-ऑप्टिक ड्रोनचा वापर करून शत्रूवर अचूक हल्ले करण्यात तरबेज आहे.






