इराणचे सुप्रीम नॅशनल काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?
लारीजानी यांनी इस्लामिक राष्ट्रांच्या मौन राहण्यावर टिका केली. त्यांनी म्हटले की, संकटकाळात इराणला मुस्लिम देशांनी एकटे पाडले आहे. ते म्हणतात, जर एखादा मुसलमान दुसऱ्या मुसलमानाची हाक ऐकूनही मदतीला धावून जात नसेल, तर तो खरा मुस्लिम नाही. त्यांच्या या विधानाने जगभरात खळबळ उडाली आहे.
लाजीरानी यांनी आखाती मुस्लिम देशांना थेट प्रश्न केला, इराणवर अमेरिकी हल्ले होत असतानाही तुम्ही मौन का पाळले आहे? लाजीरानी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट सांगितले की, इराण राजनैतिक चर्चेत व्यस्त होता त्यावेळी अमेरिका(America)-इस्रायल(Israel) ने त्यांना धोका देत त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांची हत्या करण्यात आली. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी शहीद झाले. अनेक निरापराध लोकांचाही बळी गेला. एवढी मोठी जीवितहानी होऊनही एकही मुस्लिम देशाने राजकीय किंवा लष्करी पातळीवर त्यांना साथ दिली नाही हे अत्यंत खेदजनक असल्याचे लाजीरानी यांनी म्हटले.
त्यांच्या मते इस्लामिक राष्ट्रांच्या मौनाने इराणला मोठ्या पेचात पाडले आहे. तसेच त्यांनी मुस्लिम राष्ट्रांना इशाराही दिला आहे की, अमेरिका-इस्रायल कोणताचेही मित्र नाहीत. आज त्यांनी इराणला लक्ष्य केले आहे, उद्या इतर इस्लामिक देशांची पाळ येऊ शकते. त्यांनी हेही स्पष्ट केले की, इराणला केवळ प्रादेशिक सुरक्षा हवी आहे, त्यांना कोणावरही राज्य गाजवायचे नाही.
अली लाजीरानी हे इराणच्या राजकारणातील आणि लष्करातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. खामेनेई यांच्या निधनानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेने त्यांच्यावर १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीरे केले आहे. अमेरिका लाजीरानी यांना पश्चिम आशियातील अमेरिकन हितसंबंधासाठी धोका मानते.
Six-Point Letter by Ali Larijani Addressed to the Muslims of the World and Islamic Governments Secretary of the Supreme National Security Council In the Name of God, the Most Compassionate, the Most Merciful To the Muslims of the world and the governments of Islamic countries,… — Iran in India (@Iran_in_India) March 16, 2026
Ans: इराणचे सुप्रीम नॅशनल काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनी इस्लामिक राष्ट्रांना एक खुले पत्र लिहीत टीका केली की, जर एखादा मुस्लिम देश दुसरे मुस्लिम राष्ट्रा संकटात असताना मदतीसा धावून येत नाही तर तो खरा मुसलमान नाही. तसेच त्यांनी मुस्लिम राष्ट्रांनी इराणवर होणाऱ्या हल्ल्यांवर मौन का पाळले आहे? असा प्रश्न केला आहे.
Ans: इराणच्या मते, अमेरिका-इस्रायल कोणाचेही मित्र नाहीत, आज इराणवर हल्ला झाला आहे, उद्या दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रावरही हल्ला होऊ शकतो.






