Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान

US-Iran War: अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबतच्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, इराणने पाकिस्तानात कोणतीही चर्चा होत असल्याचे नाकारले असून, हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे आणि सध्या चर्चा होणे अशक्य असल्याचे सांगितले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2026 | 10:56 AM
iranian delegation skips pakistan peace talks shehbaz munir diplomatic blow 2026

iranian delegation skips pakistan peace talks shehbaz munir diplomatic blow 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणचा महाधक्का
  • शहबाज शरीफ आणि मुनीर यांचा अपमान
  • अटींशिवाय चर्चा नाही

Iranian delegation not in Pakistan news : आंतरराष्ट्रीय स्तरावर आज (१० एप्रिल) पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्ध (US-Israel Iran War) थांबवण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) इस्लामाबादमध्ये ज्या ‘शांती बैठकी’चे आयोजन केले होते, त्या बैठकीत सहभागी होण्यास इराणने स्पष्ट नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ पाकिस्तानात पोहोचल्याच्या बातम्या इराणने ‘फेक न्यूज’ ठरवल्या आहेत. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या राजनैतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

इराणचा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला सणसणीत चपराक

काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी, विशेषतः ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने असा दावा केला होता की, इराणचे सर्वोच्च नेते चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘तस्नीम न्यूज’ने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. इराणने म्हटले आहे की, “आमचे नेते तेहरानमध्येच असून ते आपल्या कामात व्यस्त आहेत. आमची राजनैतिक स्थिती कमकुवत करण्यासाठी मुद्दाम अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.” इराणच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानने केलेली जय्यत तयारी आता व्यर्थ ठरताना दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peace Talks: ‘आम्ही महासत्ता बनणार!’ मोजतबा खामेनींचे शस्त्रसंधीनंतरचे पहिलेच स्फोटक विधान; सूड घेणार म्हणत अमेरिकेला थेट चॅलेंज

“चर्चा अशक्य!” इराणच्या कठोर अटी

इराणने केवळ चर्चा नाकारली नाही, तर अमेरिकेला स्पष्ट इशाराही दिला आहे. संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलकडे वेळ कमी आहे. जोपर्यंत लेबनॉनमध्ये पूर्णपणे युद्धविराम लागू होत नाही आणि इस्रायल आपली लष्करी कारवाई थांबवत नाही, तोपर्यंत अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इराणला केवळ वेळकाढू चर्चा नको असून एक ‘चिरस्थायी तोडगा’ हवा आहे. गालिबाफ यांनी बजावले आहे की, जर हल्ले थांबले नाहीत, तर परिस्थिती अधिक गंभीर होईल.

The Iranian negotiating team has not arrived in the Pakistani capital Islamabad and has no plans to attend peace talks with the US until Israel stops bombing Lebanon, Fars News Agency reported https://t.co/NmYVJ3F3Z6 pic.twitter.com/W7QkA2RsXT — Anadolu English (@anadoluagency) April 10, 2026

credit – social media and Twitter

किल्ल्यात रूपांतर झालेले इस्लामाबाद पण…

पाकिस्तानने या चर्चेसाठी इस्लामाबादचा कोपरा कोपरा सील केला होता. १०,००० हून अधिक पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान रस्ते आणि ‘रेड झोन’मध्ये तैनात करण्यात आले होते. लष्करी देखरेखीखाली कडेकोट बंदोबस्त असतानाही ज्यांच्यासाठी ही तयारी होती, ते इराणी पाहुणेच आले नाहीत. पाकिस्तानने स्वतःला एक मोठा मध्यस्थ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, पण इराणच्या या अनपेक्षित नकारामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर शरमिंदे व्हावे लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Geography: ‘दोन पर्वतरांगा, दोन वाळवंटे अन् दोन समुद्र’, इराणची सर्वात धोकादायक ‘शस्त्रे’; महासत्ता का थरथरते ‘या’ शक्तीसमोर?

काय असेल युद्धाची पुढची दिशा?

इराणने जरी पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेचे वरवर कौतुक केले असले, तरी प्रत्यक्ष चर्चेपासून दूर राहून त्यांनी ट्रम्प प्रशासनाला मोठा संदेश दिला आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे. जर लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी झाली नाही, तर आखातातील तणाव आणखी वाढणार असून होर्मुझची नाकेबंदी कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांचा ‘सॉफ्ट डिप्लोमसी’चा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये का पोहोचले नाही?

    Ans: इराणच्या मते, लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्याशिवाय अमेरिकेसोबत चर्चा करणे अशक्य आहे, म्हणून त्यांनी ही बैठक नाकारली आहे.

  • Que: इराणने कोणत्या बातम्यांना 'फेक न्यूज' म्हटले आहे?

    Ans: इराणचे नेते अब्बास अराघची आणि गालिबाफ पाकिस्तानात चर्चेसाठी गेल्याच्या बातम्यांना इराणने पूर्णपणे खोटे ठरवले आहे.

  • Que: या घटनेमुळे पाकिस्तानच्या भूमिकेवर काय परिणाम होईल?

    Ans: पाकिस्तानने मध्यस्थीचा मोठा प्रयत्न केला होता, पण इराणने चर्चा नाकारल्याने पाकिस्तानच्या राजनैतिक प्रतिमेला धक्का बसला आहे.

Web Title: Iranian delegation skips pakistan peace talks shehbaz munir diplomatic blow 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती
1

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले
2

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक
3

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक

Balochistan Protest : PoK नंतर बलुचिस्तानमध्ये वाढला तणाव; आंदोलकांवर कारवाई, मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप
4

Balochistan Protest : PoK नंतर बलुचिस्तानमध्ये वाढला तणाव; आंदोलकांवर कारवाई, मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.