Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

Iran Women Protest : अमेरिका इराण युद्धविरामाबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणी महिलांनी अमेरिकेशी होणाऱ्या चर्चेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 11:18 AM
Iran Women Protest against US-Israel war on Iran

Iran Women Protest against US-Israel war on Iran

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेविरोधात इराणी महिलांचा एल्गार
  • शांतता चर्चेला कडाडून विरोध
  • नेमकं प्रकरण काय?
US Iran Peace Talks : तेहरान : अमेरिका इराण-वादात (US Iran Conflict) नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चेचे वारे वाहत असताना, दुसरीकडे हजारो इराणी महिला याविरोधात आल्या आहेत. या महिलांनी शांतता चर्चेला तीव्र विरोध केला आहे. अमेकिवेर विश्वास ठेवता येणार नाही अशा घोषणा महिला देत आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे याच वेळी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे.

Hormuz Strait : जगाची जीवनवाहिनी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा प्रवाहित! पण ट्रम्प यांच्या ‘या’ एका इशाऱ्याने तणावाचे वातावरण

तेहरानमध्ये महिलांची अमेरिकेविरोधात रॅली

शुक्रवारी (१७ एप्रिल) अमेरिकेच्या तेहरानमध्ये Devoted Daughters of Iran या बॅनरखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली इमाम हुसेन स्क्वेअरपासून ते वालियार इंटरसेक्शन पर्यंत काढण्याकी आले. यावेळी इराणी महिलांनी  अमेरिका-इस्रायलच्या धोरणांचा प्रखरपणे विरोध केला. इराणी महिलांच्या मते, शांतता चर्चेच्या नावाखाली इराणच्या सार्वभौमत्त्वाशी तडजोड केली जात आहे. त्यांनी संपूर्ण जगासमोर अमेरिका-इराण (Iran)चर्चेबाबत संशय व्यक्त केला आहे. भूतकाळातील कटू अनुभवांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेऊ शकत नाही असे महिलांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचा दावा

दरम्यान याच गदारोळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज इराणसोबत पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. युद्ध कायमचे संपवण्यासठी दोन्ही देशांत कराराची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु इराणच्या जनतेच्या अविश्वासामुळे आणि अमेरिकेसोबतच्या जुन्या इतिहासामुळे चर्चेवर गाढ संशय व्यक्त केला जात आहे.

होर्मुझचा मार्ग खुला

दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावरुन माहिती देत होर्मुझ खुला केल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या १० दिवसांच्या युद्धविरामांतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यावसायिकांसाठी खुली करण्यात येत आहे. तसेच इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धही तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

इराणच्या या घोषणेमुळे सध्या जागतिक तेल आणि उर्जा पुरवठ्याला दिलासा मिळाला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता कमी होईल. इंधनाचे दर पुन्हा स्थिर होण्यास मदत होईल. पण याच वेळी इस्लाबादमध्ये दुसऱ्यांदा होणाऱ्या शांतता कराराकडेही जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेवर जगाचे पुढील भवितव्य टिकून आहे. यामुळे कायमस्वरुपी युद्धविराम होणार की युद्ध पुन्हा भडकणार असा प्रश्न लोकांना पडला आहे.

Energy Crisis 2026: भारताने इंधन मदतीचा हात देताच शेजारी देशांना मिळाला आधार; मालदीवसह अनेक देशांची मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणी महिलांनी रॅली का काढली?

    Ans: तेहरानमध्ये इराणी महिलांनी Devoted Daughters of Iran अंतर्गत अमेरिकेसोबत सुरु असलेल्या शांतता चर्चेचा निषेध नोंदवला आहे. अमेरिकेवर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही असे या महिलांचे म्हणणे आहेय शांतता कराराच्या नावाखाली इराणच्या सार्वभौमत्त्व आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड होऊ नये असे या महिलांनी म्हटले आहे.

  • Que: होर्मुझबाबत इराणने काय निर्णय घेतला आहे?

    Ans: इराणने अमेरिकेसोबच्या १० दिवसांच्या युद्धविराम करारांतर्गत होर्मुझचा मार्ग जगभरातील व्यावसायिकांसाठी खुला केला आहे.

Web Title: Iranian women against us israel iran peace talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.