
Iran's Supreme Leader Khamenei serious accusations against Trump over Gaza
तसेच त्यांनी ट्रम्प यांनी इराणचे शत्रू म्हटले असून इराणनने काय करावे हे सांगण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे म्हटले आहे. इराणचा अणु प्रकल्प हा त्यांचा सार्वभौम अधिकार आहे, असा इशारा खामेनेईंनी दिला आहे. अमेरिका हा इरणता मित्र नाही, शत्रू आहे, असे म्हटले आहे.
खामेनेईंनी ट्रम्पच्या धमक्यांना पोकळ शब्द म्हटले आहे. तसेच त्यांनी गाझात घडणाऱ्या घटनांवरुन इस्रायल (Israel) आणि अमेरिकेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, गाझात हजारो निरापराध लोकांची, विशेष करुन महिला आणि लहाना मुलांची हत्या केली जात आहे. हे दहशतवादी कृत्य असून ट्रम्प यावर कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत असे खामेनेईंनी म्हटले आहे. खामेनेईंनी ट्रम्प यांच्यावर आरोप केला की, ते केवळ इस्रायलच्या झिओनिस्टवादी धोरणांना पाठबळ देत आहेत. गाझातील गुन्ह्यांमध्ये अमेरिका हा इस्रायलचा मुख्य भागीदार आहे.
खामेनेई यांच्या मते, इस्रायलकडे अमेरिकेन शस्त्रसामग्री मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा वापर गाझातील (Gaza) पॅलेस्टिनींची हत्या करण्यासाठी केला जात आहे. आतापर्यंत गाझातील २० हजारांहून अधिक महिला आणि मुलांची इस्रायलने निघृणपणे हत्या केली आहे. हमासवर (Hamas) हल्ला करण्याच्या बहाण्याने इस्रायल निरापराध लोकांचा जीव घेत आहे. मग खरे दहशतवादी कोण? हमास, गाझातील लोक की इस्रायल असा प्रश्न खामेनेईंनी केला आहे.
खामेनेईंनी म्हटले आहे की, गाझातील परिस्थितीला इस्रायलसोबत अमेरिकाही तितकाच जबाबदार आहे. अमेरिकेने इस्रायलला शस्त्रपुरवठा बंद केला, तर गाझातील त्यांच्या कारवाया थांबतील. पण ट्रम्प असे करणे अशक्य असल्याचे खामेनेईंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिका ISIS सारख्या संघटनांना निर्माण करुन मध्यपूर्वेत अस्थिरता पसरवत असल्याचाही आरोप केला आहे. खामेनेईंच्या या विधानांमुळे मध्यपूर्वेतील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रश्न १. इराणचे नेते खामेनेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय टीका केली?
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी ट्रम्प यांच्या त्यांच्या अणु प्रकल्प उद्ध्वस्त करण्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ट्रम्प हे केवळ स्वप्नातच करु शकतात असे त्यांनी म्हटले आहे.
प्रश्न २. गाझातील परिस्थितीवरुन खामेनेईंनी काय म्हटले?
गाझातील परिस्थितीसाठी इस्रायलसोबत अमेरिकाही तितकाच जबाबदार असल्याचे सर्वोच्च नेते खामेनेईंनी म्हटले आहे.