Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iryna Zartuska : अमेरिकेत युक्रेनियन निर्वासित इरीना जरतुस्का हत्येमुळे वाद; सुरक्षिततेसाठी आलेल्या भूमीवरच तिचा दुर्दैवी अंत

Iryna Zartuska: रशियाकडून युक्रेनवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी युक्रेनियन वंशाची नागरिक इरिना जरतुस्का अमेरिकेत पोहोचली होती. पण अमेरिकेतच तिची हत्या करण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 07, 2025 | 09:06 PM
iryna zartuska ukrainian refugee in america life story highlights

iryna zartuska ukrainian refugee in america life story highlights

Follow Us
Close
Follow Us:

Iryna Zarutska : रशियाकडून युक्रेनवर सुरू असलेल्या युद्धाच्या सततच्या सावटामुळे लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. आपल्या मुलांना, कुटुंबाला आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेकांनी जगभरातील विविध देशांमध्ये आसरा शोधला. अशाच निर्वासितांपैकी एक होती इरीना जरतुस्का, युक्रेनमधील ३८ वर्षीय तरुणी. युद्धाच्या भीषण परिस्थितीतून पळ काढून ती अमेरिकेत पोहोचली होती. अमेरिकेतील सुरक्षिततेत तिला नवा श्वास, नवे जीवन मिळेल, अशी तिची आशा होती. मात्र नशिबाने क्रूर खेळी केली आणि ज्या भूमीवर ती जिवंत राहण्याची स्वप्ने घेऊन आली होती, त्याच भूमीवर तिचा भयावह मृत्यू झाला.

चाकूच्या वारांनी संपवले आयुष्य

२२ ऑगस्ट रोजी नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शार्लोट येथे इरीना रोजच्या प्रमाणे पिझ्झेरियाच्या गणवेशात लाईट रेल्वे ट्रेनने प्रवास करत होती. तिच्या आयुष्यात काही क्षण शिल्लक राहिले आहेत, याची तिला कल्पनाही नव्हती. अचानक गर्दीतून डेकार्लोस ब्राउन ज्युनियर नावाचा ३४ वर्षीय व्यक्ती तिच्या मागून आला आणि विनाकारण चाकूने वार करू लागला. काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात इरीनाचा अंत झाला. प्रवाशांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही क्षणार्धात संपले.

आरोपीचा काळा इतिहास

हत्या करणारा डेकार्लोस ब्राउन ज्युनियर हा सामान्य नागरिक नव्हता. त्याचा गुन्हेगारी इतिहास मोठा होता. २०११ पासून चोरी, दरोडा आणि हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अनेक वेळा अटक झाली होती. तरीसुद्धा तो वारंवार तुरुंगातून बाहेर पडत राहिला. विशेष म्हणजे, मानसिक आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाच्या आदेशाने त्याची सुटका करण्यात आली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?

जुलै २०२५ मध्ये त्याच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की डेकार्लोस मानसिकदृष्ट्या आजारी असून कोणत्याही खटल्यासाठी तो अयोग्य आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत त्याला तुरुंगातून सोडले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, त्याची सुटका कोणत्याही देखरेखीशिवाय करण्यात आली. फक्त एका महिन्याने, त्याने एका निर्दोष निर्वासित महिलेचा जीव घेतला.

न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर अमेरिकेतील गुन्हेगारी न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षितता यंत्रणावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • जर आरोपी धोकादायक होता तर त्याला मोकळे का सोडण्यात आले?

  • मानसिक आजाराच्या नावाखाली त्याला शिक्षा टाळण्याची मुभा का देण्यात आली?

  • अशा व्यक्तींच्या सुटकेनंतर त्यांच्यावर कोणतीही देखरेख का ठेवली जात नाही?

या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. मात्र इरीनाचा मृत्यू हे या त्रुटींचे भयानक उदाहरण बनले आहे.

अमेरिकेत संतापाची लाट

इरिना जरतुस्का हिच्या हत्येनंतर अमेरिकन जनतेत संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. ट्रेनमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून यात हत्येपूर्वी व नंतरचे दृश्य स्पष्ट दिसते. अनेकांनी या घटनेला “अमेरिकन न्यायव्यवस्थेचे अपयश” असे म्हटले आहे.

23-year-old Iryna Zarutska escaped war in Ukraine, only to lose her life here in America. On her way home from work, she was senselessly attacked and killed. Her story won’t make headlines, and there won’t be protests in her name — but her life mattered. 🕊️ #JusticeForIryna pic.twitter.com/P9N95ZwQL1 — WiseNuts (@wise_nuts) September 6, 2025

credit : social media

निर्वासितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

इरिना जरतुस्का अमेरिकेत आली ती युद्धाच्या भीतीतून सुटका मिळवण्यासाठी. पण सुरक्षिततेच्या नावाखाली असलेले हे देश तिच्यासाठी घातक ठरले. या घटनेनंतर निर्वासितांच्या सुरक्षिततेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर एखादा गुन्हेगार इतक्या सहजपणे मुक्तपणे फिरू शकतो, तर परदेशातून आलेल्या असुरक्षित नागरिकांचे रक्षण कसे होणार?

इरीनाची कहाणी : एक वेदनादायी वास्तव

इरिनाने युद्धग्रस्त मातृभूमीतून निघताना कदाचित विचार केला असेल  “अमेरिकेत पोहोचल्यानंतर मला नवे जीवन सुरू करता येईल.” पण नियतीने तिला फसवले. तिच्या मृत्यूने फक्त तिचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण अमेरिकन समाज हादरला आहे. ती फक्त एक निर्वासित नव्हती, तर ती हजारो निर्वासितांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?

मानवी सुरक्षिततेच्या हक्काचा प्रश्न

इरिना जरतुस्का हिचा मृत्यू हा फक्त एक गुन्हा नाही, तर मानवी सुरक्षिततेच्या हक्काचा प्रश्न आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेतील त्रुटींनी एका निर्दोष महिलेचे आयुष्य हिरावून घेतले. आज इरिनाचे नाव अमेरिकन जनतेत न्याय आणि सुरक्षिततेच्या लढ्याचे प्रतीक बनले आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने एक गंभीर संदेश दिला आहे सुरक्षिततेची हमी नसलेली भूमी कधीच खरी आश्रयभूमी ठरू शकत नाही.

Web Title: Iryna zartuska ukrainian refugee in america life story highlights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • America
  • Effect Of Russia Ukraine War
  • International Political news
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL
1

भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL

कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार
2

कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार

Russia Ukraine War : ‘व्यर्थ चर्चा…’ ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण?
3

Russia Ukraine War : ‘व्यर्थ चर्चा…’ ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण?

America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
4

America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.