
ISI boosts threat via Dawood’s drug and terror network in Bangladesh
ISI-Dawood nexus : भारताच्या पूर्व सीमेवर( Eastern border of India) वाढणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांना आता एक नव्या स्वरूपाचा चेहरा मिळत आहे. पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) बांगलादेशात खोलवर शिरकाव करत असून, दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी नेटवर्कचा वापर करून तेथे ड्रग्ज तस्करी, निधी उभारणी आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. हा संपूर्ण डाव भारताविरुद्धचे संकरित युद्ध (Hybrid Warfare) उभे करण्याचा मोठा कट असल्याचे उघड झाले आहे.
२०२४ मध्ये बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळून मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. याच काळात पाकिस्तानने बांगलादेशातील राजकीय गोंधळाचा फायदा घेत भारताविरुद्ध नवीन कारवाया सुरू केल्या.
युनूस सरकारने पाकिस्तानसाठी अनेक सुरक्षा शिथिलीकरणे लागू केली,
या बदलांचा फायदा घेत ISI आणि डी-कंपनीने बांगलादेशातील बंदरे, किनारपट्टी आणि व्यापारी मार्गांवर आपले जाळे अधिक मजबूत केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात
दाऊदची डी-कंपनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आग्नेय आशियामध्ये दशकांपासून ड्रग्ज तस्करीत गुंतलेली आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी विद्यमान मार्गांवर कडक नियंत्रण आणल्यानंतर, ISI ने बांगलादेशला नवीन ट्रांझिट पॉइंट बनवले.
याचे काही मोठे पुरावेही उघड झाले आहेत,ऑक्टोबर २०२५: चितगाव बंदरातून २५ टन अंमली पदार्थ-ग्रेड अफूचे बियाणे जप्त
या ड्रग्ज व्यापारातून मिळणारा पैसा थेट दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो, असे देखील तपासात समोर आले.
⚠️ Report: A covert alliance is going on between Myanmar’s junta and Bangladesh’s intelligence agencies to revive the Arakan Rohingya Salvation Army (ARSA) near Mizoram, India. 🔉 Objective is to create an Jihadi base near Chattogram. 🇵🇰 Pakistan’s transnational criminal agency… pic.twitter.com/Jd2J8d6v0f — Intel Sage 🇮🇳 (Intel Monk) (@IntelSage) November 1, 2025
credit : social media
युनूस सरकार स्थापन झाल्यानंतर ISI ने बांगलादेशातील जिहादी संघटनांसोबत पुन्हा सक्रिय संपर्क वाढवला.
या सर्व गोष्टींसाठी बांगलादेश ISI साठी “सेफ झोन” बनला. विशेष म्हणजे, जनरल झिया-उल-हक यांच्या काळापासून पाकिस्तानचे तत्वज्ञान स्पष्ट आहे, “ड्रग्जच्या पैशातून दहशतवादाला निधी” हा मॉडेल ISI आजही फॉलो करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या
भारत-बांगलादेश सीमा हजारो किलोमीटरची असून अनेक ठिकाणी खुली आहे. अशा परिस्थितीत ड्रग्ज, शस्त्रे, नकली चलन, रोहिंग्या नेटवर्क, दहशतवादी हालचाली यांचा भारतात प्रवेश अधिक सोपा होतो.
सध्या ISIचे प्रमुख केंद्र :
या तळांमधून भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करणे, युवकांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढणे, आणि जिहादी नेटवर्क वाढवणे हा मुख्य उद्देश ठेवला आहे.
भारताच्या सुरक्षा एजन्सी या परिस्थितीवर कठोर नजर ठेवून आहेत. सीमावर्ती भागात अधिक तैनाती, ड्रोन सर्व्हिलन्स, आणि इंटेलिजन्स कॉर्डिनेशन वाढवण्यात आले आहे. मात्र, बांगलादेशातील राजकीय अनिश्चितता आणि पाकिस्तानचा वाढता हस्तक्षेप हा भारतासाठी दीर्घकालीन धोका ठरू शकतो.
Ans: ISI दाऊदच्या डी-कंपनीद्वारे ड्रग्ज तस्करी, दहशतवादी प्रशिक्षण आणि निधी उभारणी करत आहे.
Ans: बांगलादेशातील सुरक्षा शिथिलीकरणामुळे ड्रग्ज, शस्त्रे आणि दहशतवादी सहज प्रवेश करू शकतात.
Ans: ड्रग्जमधील कमाई थेट भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाते.