पाकिस्तानच्या कुख्यात ISI (Inter-Services Intelligence) संस्थेचा भारतात हनी ट्रॅपद्वारे हेरगिरीचा मोठा कट उघड झाला आहे. महाराष्ट्र ATSच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून ठाण्यातील 27 वर्षीय रवी वर्मा या तरुणाला ISIच्या एजंट्सनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून भारतातील संवेदनशील लष्करी माहिती मिळवली होती. कंपनीचे नाव आणि त्याचा वैयक्तिक नंबर सार्वजनिक ठेवून, वर्मा सहजपणे पाकिस्तानी कटाचा बळी ठरला.
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने तलवारीने केली पत्नीची निर्घृण हत्या
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता. तपासात दिसून आले आहे , पीआयओच्या महिला एजंट्सनी जाणूनबुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तानमधून होत असल्याचं हे कळू नये.
भारतीय नागरिक म्हणून ओळख
पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या महिला एजंट्सनी स्वात:ला भारतीय नागरिक म्हणून वर्मा यांना ओळख पटवून दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला. वर्मा यांना आमिष दाखवून युद्धनौका आणि पाणबुड्यांसारखी संवेदनशील संरक्षण माहिती, फोटो आणि व्हिडिओ मागितले. एटीएसच्या सूत्रांनुसार, आरोपीशी संपर्क साधण्यात आलेले सर्व 5-6 मोबाईल नंबर हे भारतीय सिमकार्ड आहेत. हे सिमकार्ड पाकिस्तानी एजंट्सना कोणी आणि कसे पुरवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एटीएसने या संदर्भात तपास अधिक तीव्र केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. जो पाकिस्तानी एजंटना भारतीय सिम कार्ड पुरवण्यात सहभागी होता. अटक आकारण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव हसन असं आहे. आता महाराष्ट्र एटीएस दिल्ली पोलिसांशी सतत संपर्कात आहे, जेणेकरून हसनचा रवी वर्मा प्रकरणाशी काही संबंध आहे का हे शोधता येईल.
सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान, रवी वर्माला पाकिस्तानी एजंट्ससोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात सुमारे 9000 रुपये देण्यात आले होते, असेही तपासात उघड झाले आहे. हे पैसे मृत खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, ज्याचे विश्लेषण अजूनही सुरू आहे.
ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात ठोस संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानी एजंट्सनी भारतीय नंबर वापरून रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. या खुलाशानंतर एटीएसने एक सार्वजनिक सूचना देखील जारी केली आहे, ज्यामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अज्ञात भारतीय आणि परदेशी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल गांभीर्याने घ्यावेत आणि त्यांना प्रतिसाद देऊ नका. तसेच अश्या कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजबद्दल तातडीने पोलिसांना कळवावे. ही एक वेगळी घटना नाही. तपासात असे दिसून आले आहे की, पीआयओ एजंट केवळ रवी वर्माच नाही तर भारतातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे भारतीय सिम कार्डद्वारे अनेक लोकांना लक्ष्य करत आहेत. ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे, जी पहलगाम हल्ल्यानंतर उघडकीस आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Accident News: एसटी बसचे गोंदिया व बेळगावमध्ये भीषण अपघात, ३ ठार, ३० हून अधिक जखमी