'इराकपासून लिबियापर्यंत...' खोटे आरोप लावून अमेरिका इतर देशांमध्ये घडवतोय युद्ध, अहवालामुळे खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US military interventions list 1798-2022 : जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेने गेल्या काही दशकांत ‘लोकशाही’ आणि ‘सुरक्षेच्या’ नावाखाली अनेक देशांचे नकाशे बदलले आहेत. नुकत्याच व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर, अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा हा अस्वस्थ करणारा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ (CRS) या सरकारी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, अमेरिकेने केवळ गेल्या ३५ वर्षांत तब्बल २५१ वेळा इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लष्करी बळाचा वापर केल्याचे समोर आले आहे.
२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला हा इतिहासातील सर्वात वादग्रस्त हस्तक्षेप मानला जातो. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी दावा केला होता की, सद्दाम हुसेन यांच्याकडे ‘जैविक आणि रासायनिक शस्त्रे’ (WMDs) आहेत, जी जगासाठी धोकादायक आहेत. या नावाखाली इराकवर भीषण बॉम्बवर्षाव करण्यात आला आणि सद्दाम यांची सत्ता उलथवून लावली. मात्र, २००४ मध्ये अमेरिकेच्याच ‘इराक सर्वेक्षण गटा’ने कबूल केले की, तिथे कोणतीही सक्रिय जैविक शस्त्रे नव्हती. खोट्या आरोपांमुळे एका समृद्ध देशाचे रूपांतर युद्धभूमीत झाले.
२०११ मध्ये ‘नाटो’ (NATO) च्या मदतीने अमेरिकेने लिबियामध्ये हस्तक्षेप केला. मुअम्मर गद्दाफी हे आपल्याच जनतेवर अत्याचार करत असल्याचा दावा करून अमेरिकेने तिथे लष्करी कारवाई केली. मात्र, २०१६ मध्ये ब्रिटीश संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले की, लिबियावरील हा हल्ला चुकीच्या आणि अपूर्ण गुप्तचर माहितीवर आधारित होता. आज लिबिया अस्थिरता आणि यादवी युद्धाच्या खाईत लोटला गेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार
TWO PICTURES… SAME LIE 20 YEARS LATER! In Iraq, It Was All About The Lies of Weapons of Mass Destruction! Till Today, Iraq has Been Ravaged and No Weapons of Mass Destruction but They Are Stealing Iraqi Oil and The People are Poorer With Al Qaeda and ISIS Dominating. Today… pic.twitter.com/gstOTerpjl — Retson Tedheke (Sarkin Yakin Ga’ate) (@RetsonTedheke01) January 3, 2026
credit : social media and Twitter
सीरियामध्ये रासायनिक हल्ल्यांचा आरोप करून अमेरिकेने अनेकवेळा क्षेपणास्त्र हल्ले केले. २०२४ मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे बशर अल-असद यांना सत्ता सोडावी लागली, परंतु तिथे शांतता प्रस्थापित होण्याऐवजी दहशतवादी गटांचा प्रभाव वाढला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानात अल-कायदाचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या अमेरिकन सैन्याला २० वर्षांनंतर रिकाम्या हाती परतावे लागले आणि आजही तिथे तालिबानचीच सत्ता आहे. अमेरिकेच्या २० वर्षांच्या रणनीतीचे हे सर्वात मोठे अपयश मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर
३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेली कारवाई ही या साखळीतील नवी कडी आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा (Drug Trafficking) आरोप लावून मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, व्हेनेझुएलातील अफाट तेल साठ्यावर नियंत्रण मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश असू शकतो. ट्रम्प यांनी उघडपणे म्हटले आहे की, “आम्ही आता व्हेनेझुएला चालवू आणि तिथल्या तेल पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून नफा कमवू.”
Ans: अधिकृत अहवालानुसार, १९९१ ते २०२२ दरम्यान अमेरिकेने २५१ वेळा इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केले आहेत.
Ans: इराककडे जैविक आणि रासायनिक शस्त्रे असल्याचा दावा अमेरिकेने केला होता, परंतु नंतर तिथे असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
Ans: ही अमेरिकेची एक सरकारी संशोधन संस्था आहे, जी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना धोरणात्मक निर्णयांसाठी माहिती आणि अहवाल पुरवते.






