Israel bomb attack on Lebanon targeting Hezbollah sites
बेरुत: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धविराम सुरु असताना अनेक अडथळे निर्माण होते आहेत. तर दुसरीकडे हिजबुल्लाह सोबत झालेल्या युद्धविराम करारात देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. काही दिवसांपूर्वी इस्त्रायलला लेबनॉनमधून सैन्य माघारी घेण्याच्या मुदतीत वाढ करुन मिळाली होती. यामुळे हिजबुल्लाहत याविरोधा अनेक निदर्शन काढण्यात आली. यादरम्यान इस्त्रायली सैन्याने निर्देशकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे युद्ध पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती.
इस्त्रायली सैन्याला धोका?
दरम्यान पुन्हा एकदा इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करुन हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी रात्री (३१ जानेवारी) लेबनॉनमधील हिजबुल्लाह तळांवर इस्त्रायले बॉम्ब फेक केले. यामागचे कारण देताना इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने, त्यांच्या सैन्याला हिजबुल्लाकडून धोकाच्या भिती असल्याची माहिती मिळाल्याने हे हल्ले करण्यात आले आहेत. IDF ने हिजबुल्लाहच्या भूमिगत शस्त्रास्त्र कारखान्यावर हल्ले केले आहेत.
संघर्षविरामानंतर IDF चा हा पहिला हवाई हल्ला
इस्त्रायली सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला केलेल्या भूमिगत शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये हिजबुल्लाहच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचाही समावेश होता. हा शस्त्रास्त्र कारखाना सीरिया-लेबनॉन सीमेवर स्थित होता. इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्षविरामानंतर IDF चा हा पहिला मोठा हवाई हल्ला होता, यामध्ये लढाऊ विमानांचा देखील वापर करण्यात आला.
हिजबुल्लाह आणि इस्त्रायली सैन्याच्या कररानंतर इस्त्रायल सैन्य माघारीसाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती, मात्र रविवारी (२६ जानेवारी) मध्यरात्री व्हाईट हाऊसने इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धबंदी १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यामागचे कारण हिजबुल्लाहने इस्रायली हवाई क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी ड्रोन सोडला होता, यामुळे इस्त्रायलने संतप्त होऊन हिजबुल्लाहच्या या कारवाईला युद्धबंदी कराराचे उल्लंघन म्हटले होते.
शस्त्रास्त्र ठिकाणांना लक्ष्य
इस्त्रायली दलाने आज केलेल्या हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, हे हल्ले युद्धबंदी उल्लंघनाच्या प्रत्युत्तरात आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या शस्त्रे वाहून नेणाऱ्या ट्रक आणि दुसऱ्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध सुरु होण्याची भिती आहे.
सैन्य माघारी घेत असताना निदर्शकांवर गोळीबार
इस्त्रायली सैन्य माघारी जाण्याच्या मागणीत वाढ करत असताना 26 जानेवारी रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये निदर्शने काढण्यात आली होती. या निदर्शनांत युद्धंबंदी करारानुसार इस्त्रायली सैन्याने माघारी जाण्याच्या घोषाणा देण्यात आल्या. याच दरम्यान सैन्याने निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 22 जणांचा मृत्यू तर 124 जण जखमी झाले.