इस्त्रायलचा सीरियावर मोठा हल्ला; रासायनिक शस्त्रांची ठिकाणे केली उद्धवस्त
जेरुसेलम: इस्त्रायली सैन्याने सीरुयावर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याने सीरियाच्या संशयित रासायनिक शस्त्रास्त्रे आणि लांब पल्ल्यांच्या रॉकेट्सच्या ठिकाणांवर हे हल्ले केले असल्याची माहिती इस्त्रायच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. परराष्ट्र मंत्री गिडॉन यांनी सांगितले की, इस्त्रायलच्या आणि त्याच्या नागरिकांच्या सुरक्षा हे त्यांचे या हल्ल्यांचे उद्दिष्ट आहे. या कारवाईतून त्यांनी दहशतवादी गटांचा हाती ही शस्त्रे लागू नयेत म्हणून या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
सीरियामध्ये मोठे राजकीय बदल
इस्त्रायली सैन्याने केलेल्या या हवाई हल्ल्यांमुळे सीरियामधील तणाव वाढला असल्याचे गिडॉन यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी असेही नमूद केले की, दहशतवाद्यांनी रासायनिक शस्त्रे मिळण्यापासून रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण विद्रोही गटांचा उद्देश इस्त्रायल आणि त्यांच्या नागरिकांसाठी धोका निर्माण करु शकतो. 14 वर्षाच्या गृहयुद्धानंतर दहशतवाद्यांनी दमास्कसवर ताबा मिळवत बशर असद यांची सत्ता हाकलून लावली. सध्या सीरियामध्ये मोठे राजकीय बदल होत आहेत. असद कुटूंबाची 50 वर्षे चाललेली सत्ता संपुष्टात आणली गेली. ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.
अमेरिकेचाही सीरियावर हल्ला
इस्त्रायलच्या हल्ल्यांबरोबर अमेरिकेने देखील सीरियावर बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटचा पुन्हा उद्यय होऊ शकतो, या कारणाने हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे दहशतवादी गटांचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
असद सत्ता संपुष्टात आल्याने सीरियाच्या नागरिकांमध्ये आनंद
सीरियामध्ये बशर असदची सत्तापालटानंतर लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागरिक रस्त्यावर उतरुन आनंद साजरा करत आहेत. दमास्कसच्या चौकांमध्ये उत्सवाचे वातावरण दिसून आले. काही भागांमध्ये गोळीबार करून आनंद व्यक्त करण्यात आला. इस्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या कारवायांमुळे सीरियातील राजकीय स्थैर्य आणि सुरक्षा यावर परिणाम होणार आहे. मात्र, या बदलांमुळे सीरियन लोकांमध्ये नवीन आशेचा किरण दिसत आहे.
सीरियीची सत्ता HTS च्या नियंत्रणाखाली
सध्या सीरियाची सत्ता एचटीएसच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु पूर्णतः हस्तांतरित झालेली नाही. राष्ट्राध्यक्ष असद यांच्या पळून गेल्यानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल-जलाली यांनी शांततेने सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन दिले आहे. अल-जोलानी यांनीदेखील आपल्या सैन्याला सार्वजनिक स्थानांवरून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारची अधिकृत रचना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे. सत्तांतराच्या प्रक्रियेमुळे देशातील अस्थिरता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सीरियाचे भविष्य काय असे यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.