Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lebanon Crisis : लेबनॉनमधील सीझफायरदरम्यान इस्रायलची ‘मनमानी’; आखली विनाशाची नवी रेषा अन् पुन्हा सुरु केला विध्वंसाचा खेळ

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी असूनही, तणाव वाढत आहे. इराणच्या मते, इस्रायली सैन्याने गाझामधील 'यलो लाईन'प्रमाणेच लेबनॉनमध्ये एक नवीन 'यलो लाईन' तयार केली आहे आणि त्यावर हल्ले सुरू केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2026 | 09:46 AM
israel establishes yellow line in lebanon ceasefire violation news 2026

israel establishes yellow line in lebanon ceasefire violation news 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘यलो लाईन’चा थरार
  • शस्त्रसंधी नावापुरतीच
  • हिजबुल्लाहचा संताप

Israel airstrikes Lebanon ceasefire violation : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम थांबण्याचे नाव घेत नाहीये. इस्रायल आणि लेबनॉन (Israel and Lebanon War) यांच्यात १६ एप्रिल रोजी शस्त्रसंधी जाहीर झाली असली, तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच कथा सांगत आहे. इराण आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दक्षिण लेबनॉनमध्ये एक नवीन लष्करी सीमा आखली आहे, ज्याला ‘यलो लाईन’ (Yellow Line) असे नाव दिले गेले आहे. या रेषेचा वापर करून इस्रायल आता लेबनॉनच्या भूभागावर पुन्हा एकदा आक्रमक हल्ले करत आहे, ज्यामुळे नुकतीच झालेली शांतता धोक्यात आली आहे.

यलो लाईन: विनाशाची नवी रेषा?

‘यलो लाईन’ ही मुळात एक काल्पनिक लष्करी सीमा आहे, जी इस्रायलने स्वतःच्या सुरक्षेसाठी दक्षिण लेबनॉनमध्ये तयार केली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये गाझामध्ये अशाच प्रकारची रेषा आखून इस्रायलने गाझा पट्टीचे दोन भाग केले होते. आता लेबनॉनमध्येही त्याच धर्तीवर हालचाली सुरू आहेत. इस्रायलचा दावा आहे की, जे कोणी या रेषेच्या जवळ येतात किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांच्यासाठी थेट धोका आहेत. रविवारी इस्रायलने केलेले दोन हवाई हल्ले याच धोरणाचा भाग होते. धक्कादायक म्हणजे, हिजबुल्लाहचे लढवय्ये या रेषेच्या उत्तरेला असूनही त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Conflict : ‘सर्व काही ठीक आहे, प्रकरण…’ टँकर हल्ल्यानंतर इराणचे ‘ते’ शब्द; भारतासाठी इशारा की दिलासा?

शस्त्रसंधीच्या अटी आणि इस्रायलची ‘मनमानी’

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तयार केलेल्या कराराच्या रूपरेषेनुसार, इस्रायलला “आत्मसंरक्षणासाठी” योग्य वाटल्यास कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे. याच मुद्द्याचा आधार घेत इस्रायल आपले हल्ले समर्थनीय ठरवत आहे. दक्षिण लेबनॉनमधील तब्बल ५५ गावांवर इस्रायलचा ताबा अद्याप कायम आहे. तोफखाना आणि मशीनगनचा सततचा मारा यामुळे लेबनीज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इस्रायली प्रवक्त्यांच्या मते, दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

The Israeli military says it established a “yellow line” demarcation in southern Lebanon, similar to the one separating its forces from territory still held by Hamas in Gaza. 🔴 LIVE updates: https://t.co/F8KS9pU8XS pic.twitter.com/TWoMK6slHH — Al Jazeera English (@AJEnglish) April 18, 2026

credit – social media and Twitter

हिजबुल्लाह आणि लेबनॉनची संतप्त प्रतिक्रिया

हिजबुल्लाहचे नवे नेते नईम कासिम यांनी या संपूर्ण प्रकारावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी याला “लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा अपमान” म्हटले आहे. राजनैतिक चर्चा सुरू असल्या तरी इस्रायलचा हा ‘एकतर्फी’ अघोषित युद्ध सराव आम्ही सहन करणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. दक्षिण लेबनॉनमधील रस्ते सध्या आपल्या घरी परतणाऱ्या विस्थापित नागरिकांनी तुडुंब भरले आहेत, पण इस्रायलच्या नव्या हल्ल्यांमुळे हे नागरिक पुन्हा एकदा छावण्यांकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’

बोगदे आणि लष्करी हालचाली

इस्रायलने केवळ हवाई हल्लेच केले नाहीत, तर यलो लाईनच्या दक्षिणेकडील बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवरही मारा केला आहे. बोगद्याच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित व्यक्तीवर गोळीबार करून बोगद्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त करण्यात आले आहे. इस्रायलच्या मते, शस्त्रसंधीचा अर्थ असा नाही की शत्रूला पुन्हा एकदा ताकद गोळा करू दिली जाईल. मात्र, या आक्रमक भूमिकेमुळे शांततेचा हा प्रयत्न फार काळ टिकेल असे दिसत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने लेबनॉनमध्ये आखलेली 'यलो लाईन' नक्की काय आहे?

    Ans: यलो लाईन ही एक काल्पनिक लष्करी सीमा आहे, जी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये आपले नियंत्रण क्षेत्र आणि संभाव्य धोका वेगळा करण्यासाठी तयार केली आहे.

  • Que: शस्त्रसंधी असूनही इस्रायल हल्ले का करत आहे?

    Ans: अमेरिकेसोबतच्या करारानुसार इस्रायलला 'आत्मसंरक्षणासाठी' कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे, त्याचाच वापर करून ते हिजबुल्लाहच्या हालचालींवर हल्ले करत आहेत.

  • Que: हिजबुल्लाहची यावर काय भूमिका आहे?

    Ans: हिजबुल्लाहने याला लेबनॉनचा अपमान म्हटले असून, इस्रायलने हल्ले न थांबवल्यास पुन्हा एकदा मोठ्या युद्धाचा इशारा दिला आहे.

Web Title: Israel establishes yellow line in lebanon ceasefire violation news 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Israel
  • Israel and Lebanon War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद 
1

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद 

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी
2

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप
3

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

जपान हादरलं! उत्तर नागानोमध्ये ५.० रिश्टर स्केलचा भूकंप, पंतप्रधान ताकाइची यांनी जारी केला हाय अर्लट
4

जपान हादरलं! उत्तर नागानोमध्ये ५.० रिश्टर स्केलचा भूकंप, पंतप्रधान ताकाइची यांनी जारी केला हाय अर्लट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.