
Israel Hamas Ceasefire violated 500 times in 44 days killes thousands
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या 44 दिवसांत इस्रायलने 500 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. सध्या गाझामध्ये परिस्थिती बिकट आहे. पॅलेस्टिनींचा हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.हमासने इस्रायलवर युद्धबंदीच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. हमासने या संबंधी एक निवेदना जारी केला आहे.
या निवेदनात सांगण्यात आले आहे की, इस्रायली अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे. सतत गंभीर हल्ले केले जात आहे. या हल्लांचा आणि युद्धबंदीच्या उल्लंघनाचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे हमासने म्हटले आहे. हमासने इस्रायलच्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे उल्लंघन म्हणून संबोधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (22 नोव्हेंबर) रोजी इस्रायलने हमासवर तीव्र हल्ला केला होता. या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू आणि 87 जण जखमी झाले आहेत. यासाठी पूर्णपण इस्रायलला जबाबदार धरण्यात आले आहे. इस्रायल सातत्याने हल्ले करत असल्याचा आणि यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आणि साहित्यांना लक्ष्य केले जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांच्या सैन्याने हमासच्या सैन्याने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, शनिवारी(22 नोव्हेंबर) हमासच्या एका सदस्याने त्यांच्या सैन्यावर अचानक हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केले आहे. तसेच इस्रायलने या कारवाईत पाच वरिष्ठ हमास अधिकारी ठार झाल्याचेही म्हटले आहे.
पण हमासने हा दावा फेटाळला आहे. याच वेळी हमासने अमेरिकन सरकारला इस्रायलवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. हमासने म्हटले आहे की, इस्रायलन युद्धबंदीचे उल्लंघन करत असून गाझात हिंसाचार घडवून आणत आहे. इस्रायलकडून रोज आणि पद्धतशीरपणे युद्धबंदीचे उल्लंघन केले जात असल्याचे हमासचे म्हणमे आहे. सध्या गाझातील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.