Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिजबुल्लाहची युद्धाची नवी रणनीती; इस्त्रायली मिसाइलची ‘कॉपी’ करुन इस्त्रायलवरच हल्ला

Israel-Hezbollah War: हिजबुल्लाच्या लेबनॉनमधील लढाऊ गटाने इस्त्रायल विरोधात अलमास नावाच्या अत्याधुनिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. ही मिसाइल प्रत्यक्षात इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2024 | 10:44 AM
हिजबुल्लाहची युद्धाची नवी रणनीती; इस्त्रायली मिसाइलची कॉपी करुन इस्त्रायलवरच हल्ला

हिजबुल्लाहची युद्धाची नवी रणनीती; इस्त्रायली मिसाइलची कॉपी करुन इस्त्रायलवरच हल्ला

Follow Us
Follow Us:

जेरुसेलम: हिजबुल्लाच्या लेबनॉनमधील लढाऊ गटाने इस्त्रायल विरोधात अलमास नावाच्या अत्याधुनिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मिसाइल प्रत्यक्षात इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी आहे. या मिसाइलची रिव्हर्स इंजिनीअरिंग करून ही मिसाइल तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने 2006 मध्ये इस्त्रायलच्या स्पाइक मिसाइल ताब्यात घेतले आणि ती रिव्हर्स इंजिनीअरिंगसाठी इराणला पाठवली होती.

त्यानंतर इराणने या मिसाइलची रचना उलटून पाहिली आणि त्यावर आधीरितअलमास मिसाइल तयार केली. इराणने ही मिसाइल हिजबुल्लाहला पाठवली असून आता इस्त्रायलवर या मिसाइलने हल्ला करण्यात आला आहे. सुमारे 18 वर्षांनंतर हिजबुल्लाहने या नव्या प्रकारच्या मिसाइलचा वापर करत इस्त्रायली सैन्याच्या तळांवर, कम्युनिकेशन सिस्टीम आणि एअर डिफेन्स लाँचर्सवर हल्ले केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागात विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

अलमास मिसाइलचे उत्पादन सुरु

इस्त्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलमास मिसाइल जवळपास 16 किलोमीटर अंतरावर अत्यंत अचूकपणे हल्ला करु शकते. आता हिजबुल्लाहने या अलमास मिसाइलचे उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे. या अलमास मिसाइलला अरबी आणि फारसी भाषेत “हिरा” असे म्हणतात. या क्षेपणास्त्राद्वारे गाइडेड तंत्रज्ञानाचा वापर करुन या वाहने, ड्रोन, हेलिकॉप्टर तसेच खांद्यावरून डागता येते. ही मिसाइल लक्ष्यावर साइडऐवजी वरून हल्ला करते, त्यामुळे इस्त्रायल सैन्य तळांसाठी ती मोठा धोका बनली आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

रशियन क्षेपणास्त्रांचाही समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने दक्षिण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या मोठ्या शस्त्रसाठ्याचा शोध घेतला आहे. यात अलमास व्यतिरिक्त रशियन बनावटीच्या कोरनेट अँटी-टँक मिसाईल्सचाही समावेश आहे. हे आधुनिक शस्त्रास्त्र इस्त्रायलसाठी गंभीर आव्हान ठरत आहे.

इस्त्रायलचा बेरूतवर हवाई हल्ला

हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यात हल्ले आणि प्रत्युत्तर हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी रात्री इस्त्रायलने लेबनानची राजधानी बेरूतवर हवाई हल्ला केला. यात एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत 20 लोक मृत्युमुखी पडले. इस्त्रायली सैन्याने या हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, हा हल्ला हिजबुल्लाहच्या टॉप कमांडर मोहम्मद हैदरला मारण्यासाठी केला होता. मात्र, हिजबुल्लाहने दावा केला की या हल्ल्यात त्यांच्या कोणत्याही सदस्यमारला गेलेला नाही. हिजबुल्लाहच्या निवेदनानुसार, हल्ल्याच्या ठिकाणी त्यांचा एकही कमांडर उपस्थित नव्हता.

वाढता संघर्ष

इस्त्रायल-हिजबुल्लाह संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आत्तापर्यंत या संघर्षात अनेक हिजबुल्ला कमांडर्स मारले गेले. तसेच लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचेही या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यामुळे मानवीय संकट अधिक तीव्र झाले आहे. हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली 250 रॉकेट्स; तेल-अवीवच्या तळांना लक्ष्य करत दिले चोख प्रत्युत्तर

Web Title: Israel hezbollah war hezbollah using copy of israeli missile to attack on israel nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट
1

Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी
2

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?
3

‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती
4

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.