फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरुत: इस्त्रायली हल्लांमुळे लेबनॉनच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. इस्त्रायलने पुन्हा एकदा मध्य बेरुतच्या बस्ता भागामध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने 24 नोव्हेंबरला बेरुतच्या बस्ता भागांतील एका बहुमजली इमारतीवर लक्ष्य केले आहे. यामध्ये एकूण 29 जण टार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा हल्ला लेबनॉनमधील एक विनाशकारी घटनांपैकी एक होता. याने संपूर्ण लेबनॉन हादरले आहे.
12 हिजबुल्ला कमांड सेंटर्सना लक्ष्य
इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यांमध्ये बेरूतच्या दक्षिणेकडील दहेह भागातील 12 हिजबुल्ला कमांड सेंटर्सना लक्ष्य केरण्यात आले आहे. हिजबुल्ला गटाचे गुप्तचर युनिट, समुद्रातून प्रक्षेपित क्षेपणास्त्र युनिट आणि पोझिशन्स समाविष्ट असलेल्या युनिट 4400 या शस्त्रास्त्र तस्करी करणाऱ्या तळांवरही हल्ले इस्त्रायलने केले आहेत. यामुळे हिजबुल्ला गटाची दहशतवादी हल्ल्यांची योजना आणि अंमलबजावणी करण्याच्या कार्यक्षमता कमी झाल्याचे इस्त्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे.
ISRAEL JUST BOMBED LEBANON:CONVERTED THE LAND INTO HELL☠️
🗓24.11.2024
Israel launched airstrikes in Southern Beirut, Lebanon targeting many areas including residential buildings in Ghobeiry area dismantling infrastructures.
Injuries & deaths reported.#Beirut #BeirutMassacre pic.twitter.com/JX1xHY1gM0— Barbarik (@Sunny_000S) November 24, 2024
लेबनॉनच्या इतर भागातही इस्त्रायलचा विध्वंस
लेबनॉनमधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, बेरुतमधील मृतांची संख्या 20 वरून 29 झाली आहे. बचाव पथकांनी ढिगारा हटवून बचावकार्य सुरू ठेवले आहे, मात्र जोरदार गोळीबार आणि हल्ल्यांमुळे बस्तामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, इस्त्रायली हल्ल्ये पूर्व लेबनॉनच्या बालबेक-हर्मेल भागापर्यंत देखील पसरले आहेत. शमिस्तरावरील हल्ल्यात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू असून इतर ३२ जण जखमी झाले आहेत. तसेच दक्षिण लेबनॉनमधील टायर शहरावरही हल्ला करण्यात आला. यात पाच जण ठार झाले आणि 19 जण जखमी झाले.
वाढता संघर्ष
इस्त्रायल-हिजबुल्लाह संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आत्तापर्यंत या संघर्षात अनेक हिजबुल्ला कमांडर्स मारले गेले. तसेच लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचेही या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यामुळे मानवीय संकट अधिक तीव्र झाले आहे. हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
हिजबुल्लाहचे इस्त्रायलला चोख प्रत्युत्तर
हिजबुल्लाहने एक आठवडाभर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आहे. इस्त्रायलवर हिजबुल्लाहने 250 रॉकेट्स डागली असून हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. हिजहुल्लाहने 7 ऑक्टोंबर 2023 नंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल-अवीवमधील इस्त्रायलच्या गुप्त स्थळांवर देखील हल्ले केले आहेत.