Israel Iran ceasefire Iranian Foreign Minister warns Trump
Iran News Marathi : तेहरान : सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू आहे, मात्र तरीही तणावाचे वातावरण आहे. तसेच युद्धबंदीनंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणवर अणु करारासाठी दबाव आणत आहेत. परंतु याचे वेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांना खामेनींविरोधात न बोलण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय इराण अमेरिकेसोबत कोणताही करार करणार नाही असे अराघची यांनी म्हटले आहे.
अराघची यांनी ट्रम्प यांना म्हटले आहे की, “तुमच्या या वृत्तीमुळे खामेनीच नव्हे तर त्यांच्या लाखो समर्थकांचा अपमान होत आहे. यामुळे ट्रम्प यांना इराणशी कोणताही करार करायचा असेल, तर पहिल्यांदा त्यांना त्यांची भाषा सुधारावी लागेल.” डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींच्या हत्येवर केलेल्या विधानानंतर अराघची यांनी हा स्पष्ट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना मरण्यापासून त्यांनी वाचवले आहे, अन्यथा त्यांचा अतिशय वाईट मृत्यू झाला असता.
Trump VS Musk : एलॉन मस्क यांचा कर आणि खर्चाच्या बिलावरून ट्रम्पवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले…
याशिवाय अराघटी यांनी इस्रायलवरही तीव्र टीका केली आहे. मार्क रुटो यांच्यासोबतच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटले की, इराणी क्षेपणास्त्रांच्या भीतीने इस्रायल त्यांच्या ‘डॅडींकडे पळून जात आहे’ अशी हास्यास्पद टीका केली. खरं तरं पहिल्यांदा ट्रम्प यांना मार्क रुटो यांनी विनोदीवृत्ती डॅडी म्हटले यावर अराघची यांनी ही प्रतिक्रिया दिली. युद्धबंदी लागू झाल्यानंतरही इस्रायने इराणवर हल्ले केले होते, यामुळे ट्रम्प यांनी नेतन्याहूंवर संताप व्यक्त केला होता. यावेळी नाटो प्रमुख मार्क रुटो यांनी विनोदाने बाबांना कधी कधी मुलाला थांबवण्यासाठी कठोर व्हावे लागले असे म्हटले. नंतर याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
युद्धबंदी लागू झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इराणच्या विजयाची घोषणा केली होता. या दाव्यावर ट्रम्प यांनी खामेनींनावर तीव्र टीका केली होती. ट्रम्प यांनी म्हटले की, खरं तरं मी खामेनींना भयानक आणि अपमानास्पद मृत्यूपासून वाचवले आहे. त्यांनी माझे आभार मानावे याची मी अपेक्षा करत नाही. पण माझ्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहे.
तत्पूर्वी ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशिवाय इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना संपवण्याची भाषा केली होती. त्यांनी म्हटले होती की खामेनी आमच्या आवाक्यात असते, आतापर्यंत ते जिवंत राहिले नसते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.