Donald Trump and Elon Musk News : पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. पुन्हा एकदा मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आणि खर्च विधेयकाच्या नवीन सिनेट विधेयकावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी व्यंग्यात्मक शैलीत विधेयकाचे वर्णन मोठे सुंदर विधेयक म्हणून केले आहे.
मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या नव्या कर आणि खर्चाच्या धोरणाला पूर्णपणे वेडे आणि विध्वंसक म्हटले आहे. मस्क यांनी इशारा दिला आहे कीस यामुळे अमेरिकेला गंभीर धोरणात्मक नुकसान भोगावे लागले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधी पोस्ट केली आहे. या मध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, “या सिनेट मसुद्यामुळे अमेरिकेतील लाखो लोकांच्या नोकऱ्या अडचणीत येतील. यामुळे आपल्या देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान होईल.”
The latest Senate draft bill will destroy millions of jobs in America and cause immense strategic harm to our country!
Utterly insane and destructive. It gives handouts to industries of the past while severely damaging industries of the future. https://t.co/TZ9w1g7zHF
— Elon Musk (@elonmusk) June 28, 2025
मस्क यांनी या विधेयकामुळे जुन्या उद्योगांना सवलती मिळतील, परंतु यामुळे भविष्यातील नवीन उद्योगांना नुकसान होईल. हा नवीन प्रस्ताव ९४० पानांचा आहे. या विधेयकाला ४ जुलैच्या अंतिम मुदतीत लवकर मंजूर करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरु आहे. या विधेयकात मेडिकेड आणि फूड स्टॅम्प यासांरख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये खर्च कपात आणि कर सवलती, संरक्षण आणि हद्दपारीसाठी वाढीव निधी या गोष्टींचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी ४ जुलैपूर्वी हे विधेयक मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. या विधेयकाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रम्प यांनी ३५० डॉलर्स अब्ज सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षा योजनेसाठी ठेवले आहे. तसेच अमेरिका-मेक्सिको सीमेवर देखीव ४६ डॉलर्स खर्च, स्थलांतरितांच्या बंदीसाठी ४५ अब्ज डॉलर्स आणि १० हजार अब्ज डॉलर्स नवीन ICE अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आहेत.
ही योजना ट्रम्प यांच्या सर्वात मोठ्या सामूहिक मोहिमेसाठी सुरु करण्यात आली आहे. दरवर्षी १० लाख लोकांना हद्दपार करण्याची ट्रम्प यांनी योजना आखली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा याला विरोध आहे, तरीही ट्रम्प हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहे.