सध्या भारतात भारतात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का काही देशांमध्ये असे कठोर कायदे आहेत जिथे अगदी किरकोळ, छोट्या गुन्ह्यांसाठी देखील तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागते. अगदी रस्त्यावर थुंकल्यास, चिंगम फेकल्यासही कठोर शिक्षा दिली जाते. एका देशात तर सोशल मीडियावर टीका जरी केली तरी लोकांना तुरुंगवास भोगावा लागतो. आजा आपण या देशांबद्दल जाणून घेणार आहोत.
In North Korea, Singapore, Iran, Saudi Arabia, China severe punishments are given even for minor crimes
मृत्यूदंडाची शिक्षा देण्यामध्ये सर्वात आघाडीवर चीन आहे. २०१५ मध्ये चीनमध्ये २४ हिंसक गुन्हे आणि २२ अहिंसक गुन्हे प्रकरणात तब्बल २४०० लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. चीनमध्ये सोशल मीडियावर सरकारचे नियंत्रण आहे. तसेच या ठिकाणी एकपेक्षा अधिक कुत्रे पाळण्यासही मनाई आहे. सरकारविरोधी प्रचार केल्या प्राणघातक मृत्यूदंडाची शिक्षा चीनमध्ये दिली जाते.
सौदी अरेबियामध्ये दारु पिणे, जादूटोणा, इमारती किंवा राजवाड्यांचे फोटो काढणे अशा छोट्या गोष्टींसाठी कठोर शिक्षा दिली जाते. सौदी अरेबियात लोकांना मुंडके कापून मृत्यूदंडाची भयावह शिक्षा दिली जाते. तसेच महिलांना लग्न, घटस्फोट, गभर्पात, महत्त्वाचे वैद्यकीय उपचार बॅंक खाते उघडण्यास आधी पालकांची परवानगी घ्यावी लागते, असे न केल्यास कठोर शिक्षा दिली जाते.
उत्तर कोरिया हा देशन नेहमीच रहस्यमयी राहिला आहे. येछे पर्टनावर कडक निर्बंध आहेत. तसेच या देशात परदेशी नागरिकांना देखील किरकोळ गुन्ह्यांसाठी शिक्षा दिली जाते. येथील हुकूमशाह किम जोंग उन आणि त्याच्या कुटुंबीयांचा अपमान देखील करणे मोठा गुन्हा आहे. खून, लैगिंक शोषण, अपहरण, चोरी अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा आहे. तसेच सरकारच्या कोणत्याही सुचनांचे पालन न करणे देखील गुन्हा मानला जातो. या देशांतील लोकांना आंतरराष्ट्रीय कॉल करण्याची परवानगी नाही. या ठिकाणी इंटरेनट कनेक्शन नाही. परदेशी लोकांचे फोन सिग्नल देखील या देशात जॅम केले जातात.
सिंगापूरमध्ये ड्रग्ज तस्करी मध्ये सर्वात कठोर कायदा आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणे, सिगारेट वापरणे, सार्वजिनक धूम्रपान, सार्वजनिक वाहतुकीत खाणे-पिणे, रस्त्यावर थुंकणे, सार्वजिनक ठिकाणी मद्यपान, सार्वजनिक शौचालये फ्लश न करणे यासाठी कठोर दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे. १० हजार डॉलर्सपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
इराणमध्ये १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती अस्तित्वात आली तेव्हापासून महिलांसाठी कठोर कायदे आहेत. येथे नऊ वर्षापेक्षा जास्त वय असलेला महिलांना हिजाब घालणे आवश्यक आहे. तसेच पुरुषांना देखील सार्वजनिक ठिकाणी शॉर्ट, शर्टलेस राहणे देखील गुन्हा आहे. यासाठी मोठा दंड आकारला जाऊ शकतो.